आता प्रत्येक गुरूवार 'टीबी'च्या रूग्णांसाठी राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:35 AM2021-02-11T04:35:17+5:302021-02-11T04:35:17+5:30
बीड : क्षयरूग्ण शोधण्यासाठी राज्य, देशपातळीवर सर्वेक्षण केले जात आहे. यातच आता बीडमध्येही पाटोदा आरोग्य विभागाने नाविन्यपूर्ण संकल्पना हाती ...
बीड : क्षयरूग्ण शोधण्यासाठी राज्य, देशपातळीवर सर्वेक्षण केले जात आहे. यातच आता बीडमध्येही पाटोदा आरोग्य विभागाने नाविन्यपूर्ण संकल्पना हाती घेत प्रत्येक गुरूवार हा क्षयरोग रूग्णांसाठी राखीव ठेवला आहे. याची आजपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्ह्यात अशाप्रकारचा हा पहिला उपक्रम आहे.
सध्या राज्यासह देशात टीबीचे रूग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्यावर भर दिला जात आहे. यालाच आधार म्हणून पाटोदा तालुक्यात प्रत्येक गुरूवार हा टीबीसाठी राखीव ठेवला आहे. या दिवशी इतर कोणतीही कामे न करता केवळ क्षयरूग्ण शोधणे, त्यांची थुंकी नमुणे घेणे, तपासणे अशी कामे केेली जाणार आहेत. यासाठी डॉ.काकड यांची नोडल ऑफिसर म्हणून नियूक्ती केली आहे.यात वैद्यकीय अधिकारी ते आशा स्वयंसेविकांपर्यंत सर्वांना जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. याचा आढावा तालुका आरोग्य अधिकारी आठवड्याला घेणार आहेत. जिल्ह्यात अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच राबविला जात असल्याचे सांगण्यात आले.
सीएचओंची आढावा बैठक - फोटो
या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे यांनी सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यात त्यांना क्षयरोगाचे सर्वेक्षण व मोहिमेबाबत माहिती दिली. या मोहिमेत सीएचओ आणि आशांची भूमिका महत्वपूर्ण असल्याने त्यांना डाॅ.तांदळे यांनी मार्गदर्शन केले.
काय होणर या उपक्रमात
संशयीत क्षयरूग्ण शोधणे, थुंकी नमुने घेणे व त्याची तपासणी करणे, संशयितांना शासकीय वाहनाने आणून त्यांची एक्स रे तपासणी करणे, कार्ड तपासणी व ते अद्यावत करणे, गृहभेटी देणे, एचआयव्ही व शुगर तपासणी करणे, पोषण आहार भत्ता देणे असे विविध कामे या दिवशी पूर्ण केली जाणार आहेत.