आता पाणी आहे पण वीज नाही, माजलगावात ट्रान्सफार्मर बदलण्यासाठी महावितरणने शेतक-यांना दिली दीड महिन्याची वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:10 PM2017-10-31T12:10:46+5:302017-10-31T12:16:19+5:30

परतीच्या पावसाने माजलगांव धरण 100 टक्के भरले आहे. यासोबतच तालुक्यातील पाण्याचे सर्व स्त्रोत सुद्धा पूर्ण भरल्याने शेतकरी आनंदित होती. मात्र, नादुरुस्त ट्रान्सफार्मर बदलण्यासाठी महावितरणने दीड महिनाच्या कालावधी दिला आहे.

Now there is water but there is no electricity, Mahavitaran gave farmers a month and a half to change the transformer in Majalgaon | आता पाणी आहे पण वीज नाही, माजलगावात ट्रान्सफार्मर बदलण्यासाठी महावितरणने शेतक-यांना दिली दीड महिन्याची वेटिंग

आता पाणी आहे पण वीज नाही, माजलगावात ट्रान्सफार्मर बदलण्यासाठी महावितरणने शेतक-यांना दिली दीड महिन्याची वेटिंग

googlenewsNext
ठळक मुद्देनादुरुस्त ट्रान्सफार्मर बदलण्यासाठी महावितरणने दीड महिनाच्या कालावधी दिला आहे. अडचणीचा फायदा घेत महावितरणने वसुलीपोटी सूड उगविण्याचा चंग बांधल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

- पुरुषोत्तम करवा

माजलगांव ( बीड ) : परतीच्या पावसाने माजलगांव धरण 100 टक्के भरले आहे. यासोबतच तालुक्यातील पाण्याचे सर्व स्त्रोत सुद्धा पूर्ण भरल्याने शेतकरी आनंदित होती. मात्र, नादुरुस्त ट्रान्सफार्मर बदलण्यासाठी महावितरणने दीड महिनाच्या कालावधी दिला आहे. याच अडचणीचा फायदा घेत महावितरणने वसुलीपोटी सूड उगविण्याचा चंग बांधल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

माजलगाव उपविभागांतर्गत आजमितीला जवळपास ३० ते ४० शेतीपंपासाठी असणारे ट्रान्सफार्मर जळालेले आहेत. त्यात १५, २५, ६३ आणि १०० चे ट्रान्सफार्मर आहेत. साधारणत: ६३ चे ट्रान्सफार्मर हे जळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. खरीपाचे पीक हे वेळेत पाऊस न पडल्यामुळे हातचे गेले. मात्र पुढील काळात परतीच्या पावसाने  तालुक्यात पाण्याची मुबलक प्रमाणात सुबत्ता झाल्यामुळे शेतकरी आता या पाण्यावर पीक घेवून गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करीत असतानाच ‘ओव्हरलोडींग’मुळे ट्रान्सफार्मर जळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत.  बड्या नेत्यांना, पुढा-यांना तसेच वशिला असणा-यांना व पैसे देणा-यांना हे अधिकारी लगेचच ट्रान्सफार्मरची व्यवस्था करीत आहेत. मात्र आम्ही मागील २० ते २५ दिवसांपासून खेटे घालत असून देखील आम्हाला ट्रान्सफार्मर मिळत नसल्याच्या प्रतिक्रि या शेतकरी व्यक्त करीत आहेत. सध्या माजलगाव उपविभागातील ४० ते ५० टक्के ट्रान्सफार्मर जळालेल्या अवस्थेत आहेत ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. 

ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी औरंगाबाद व पंढरपूर या ठिकाणच्या एजन्सीला काम देण्यात आलेले आहे. या एजन्सींचे अंतर दूर पडत असल्याने ट्रान्सफार्मर मिळण्यास उशीर होत आहे त्यामुळे शेतक-यांना दोन-दोन महिने ट्रान्सफार्मर मिळण्यास अडचणी येत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दुसरीकडे याकडे सत्ताधारी, विरोधकांसह पुढा-यांचेही दुर्लक्ष आहे.

अधिकारी देताहेत ओव्हरलोडींगचे कारण 
वास्तविक पाहता ट्रान्सफार्मर बसवितांनाच यावर किती लोड आहे त्यानुसार ट्रान्सफार्मर बसविला जातो. मात्र, आता शेतक-यांकडुन सातत्याने ट्रान्सफार्मर बसवण्याचा रेटा पाहता ओव्हरलोडींगमुळे ट्रान्सफार्मर जळत असल्याचे कारण देऊन महावितरणचे अधिकारी अंग झटकत आहेत. 

एजन्सी आणि महावितरणमध्ये वाद 

महावितरणचे अधिकारी एजन्सी लवकर ट्रान्सफार्मर देत नसल्याने एजन्सीवर खापर फोडत आहेत. तर एजन्सीधारक हे महावितरण आमचे पैसे वेळेवर देत नाहीत त्यामुळे आम्हाला मटेरियल खरेदीला अडचणी येत असल्याचे सांगुन हात वर करीत आहेत. एजन्सी आणि महावितरणच्या या वादात शेतकरी मात्र भरडला जात आहे. 

सर्वत्र पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे ओव्हरलोडींगमुळे ट्रान्सफार्मर जळत आहेत. तसेच ट्रान्सफार्मर एजन्सीच या बाहेरगावी असल्याने त्यांच्या उपलब्धतेला वेळ लागतो. परिस्थिती पूर्वपदावर येण्यास किमान एक ते दीड महिन्याचा कालावधी लागु शकतो.
- प्रदिप निकम, उपविभागीय अभियंता, महावितरण माजलगांव 

Web Title: Now there is water but there is no electricity, Mahavitaran gave farmers a month and a half to change the transformer in Majalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.