गेवराई तालुक्यात गणेश मंडळाची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:41 AM2021-09-10T04:41:06+5:302021-09-10T04:41:06+5:30
गतवर्षी कोरोना रोगामुळे गेवराई पोलीस ठाण्या अंतर्गत फक्त ३८ सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली होती. तलवाडा ...
गतवर्षी कोरोना रोगामुळे गेवराई पोलीस ठाण्या अंतर्गत फक्त ३८ सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली होती. तलवाडा व चकलांबा येथेही मोजक्याच गणेश मंडळांनी श्री स्थापना केली होती. याही वर्षी येथील ठाण्यांतर्गत गुरुवारपर्यंत फक्त १८ गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज दाखल केले असून तलवाडा हद्दीत ८, तर चकलांबा हद्दीत ६ सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज दाखल केले आहेत. २०१९ मध्ये तालुक्यात जवळ पास २०० वर सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली होती. कोरोनामुळे ही संख्या घटली आहे.
कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव गेल्या वर्षी व याही वर्षी सार्वजनिक गणेश मंडळाची संख्या कमी झाली आहे. शासनाच्या निर्देशानुसार अनेक नियम असल्याने सर्व गणेश मंडळांनी रीतसर परवानगी घेऊन कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव शांततेत पार पाडावा, असे आवाहन येथील पोलीस ठाण्याचे गोपीनाथ शाखेचे प्रमुख नारायण खटाने यांनी केले आहे.