डासांचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:31 AM2021-04-15T04:31:20+5:302021-04-15T04:31:20+5:30
दारू विक्री बंद करा आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार ...
दारू विक्री बंद करा
आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी दारुबंदीची मागणी केली आहे. परंतु अद्यापही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
तलाठी सज्जे रिकामेच
गेवराई : तालुक्यातील अनेक ठिकाणच्या तलाठी कार्यालयाच्या इमारतीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. काही ठिकाणच्या इमारती अनेक महिन्यापासून धूळखात असून महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. सज्जावर तलाठी राहत नसल्याने कामे होईनासे झाली आहेत.
तलाठी सज्जे रिकामेच
गेवराई : तालुक्यातील अनेक ठिकाणच्या तलाठी कार्यालयाच्या इमारतीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. काही ठिकाणच्या इमारती अनेक महिन्यांपासून धूळखात असून महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. सज्जावर तलाठी राहत नसल्याने कामे होईनासी झाली आहेत.
विजेचा लपंंडाव
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागात सातत्याने वीजप्रवाह खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत, तसेच याचा मोठा फटका छोटे व्यापारी, व्यावसायिक यांना सहन करावा लागत आहे.