रुग्णसंख्येचा आलेख उतरतोय, पण मृत्यसत्र थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:33 AM2021-05-23T04:33:30+5:302021-05-23T04:33:30+5:30

बीड : गत महिनाभरापासून वाढत जाणारा कोरोना रुग्णवाढीचा चढता आलेख आता उतरु लागला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील शासकीय ...

The number of patients is declining, but the death toll will not stop | रुग्णसंख्येचा आलेख उतरतोय, पण मृत्यसत्र थांबेना

रुग्णसंख्येचा आलेख उतरतोय, पण मृत्यसत्र थांबेना

Next

बीड : गत महिनाभरापासून वाढत जाणारा कोरोना रुग्णवाढीचा चढता आलेख आता उतरु लागला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूच्या नोंदी उशिराने होत असल्याने मृत्यूचा आकडा वाढू लागला आहे. शनिवारी जिल्ह्यात २४ तासातील १४ आणि जुन्या १०२ अशा एकूण ११६ मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. तसेच नवे ७८९ रुग्ण निष्पन्न झाले तर ९८१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली.

जिल्ह्यात शुक्रवारी ५ हजार ५२० जणांची चाचणी केली गेली. यात, ७८९ नवे रुग्ण आढळले तर, ४ हजार ७३१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. नव्या बाधितांमध्ये अंबाजोगाई व आष्टी तालुक्यात प्रत्येकी ६९, बीड १९५, धारुर ४७,गेवराई १०३, केज ७५, माजलगाव ४२, परळी व शिरुर तालुक्यात प्रत्येकी ५७, पाटोदा ५३ व वडवणी तालुक्यातील २२ जणांचा समावेश आहे. ९८१ जण दिवसभरात कोरोनामुक्त झाले. दरम्यान मागील चोवीस तासांत १४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला तर जुन्या परंतू पोर्टलवर अपडेट झालेल्या १०२ मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली.

...

७२ हजार ५१० कोरोनामुक्त

आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८० हजार २०२ इतकी झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ७२ हजार ५१० इतका झाला असून आतापर्यंत १८१९ जणांचा बळी गेला आहे. सध्या ५ हजार ८६५ रुग्ण उपचाराधिन असल्याची माहिती सीईओ अजित कुंभार, डीएचओ आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी पी. के. पिंगळे यांनी दिली.

Web Title: The number of patients is declining, but the death toll will not stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.