रुग्णसंख्या कमी होतेय, पण मृत्यूसत्र थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:38 AM2021-08-25T04:38:56+5:302021-08-25T04:38:56+5:30

बीड : जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. परंतु कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबत नसल्याचे चित्र ...

The number of patients decreases, but the mortality does not stop | रुग्णसंख्या कमी होतेय, पण मृत्यूसत्र थांबेना

रुग्णसंख्या कमी होतेय, पण मृत्यूसत्र थांबेना

Next

बीड : जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. परंतु कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंगळवारी आणखी पाच मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. तसेच ९२ नवे रुग्ण आढळले, तर ८३ जणांनी कोरोनावर मात केली. मृत्यूसत्र थांबत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील संशयित असलेल्या हजार ७५४ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात ९२ लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये अंबाजोगाई ५, आष्टी ३८, बीड १३, धारूर २, गेवराई ४, केज १३, माजलगाव ५, शिरूर ७ येथील रुग्णांचा समावेश आहे. वडवणी व परळी तालुक्यात सुदैवाने रुग्णसंख्या शून्य राहिली. तसेच पाच मृत्यूची नोंद झाली. यात बीड तालुक्यातील पिंपळा येथील ६० वर्षीय पुरूष, भुरेवाडी येथील ६५ वर्षीय पुरूष, आष्टी तालुक्यातील रूई नालकोल येथील ६९ वर्षीय महिला, शिरूर तालुक्यातील तागडगाव येथील ९९ वर्षीय पुरूष, केज तालुक्यातील उमराई येथील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे. आता एकूण बाधितांची संख्या १ लाख ५७७ एवढी झाली आहे. पैकी ९६ हजार ७९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, २ हजार ६९९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ८१ रुग्ण उपचार घेत आहेत. साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.

Web Title: The number of patients decreases, but the mortality does not stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.