संकटात सापडलेल्या महिलेची परिचारिकांनी रुग्णालयाच्या परिसरातच येऊन केली प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:24 AM2021-04-29T04:24:46+5:302021-04-29T04:24:46+5:30

अंबाजोगाई : शासकीय दवाखान्यांत परिचारिकांकडून रुग्ण व नातेवाइकांना उद्धट बोलणे, परिसरात अस्वच्छता, अशा तक्रारी अनेकवेळा ऐकावयास मिळतात. मात्र, परिचारिकांमधील ...

The nurses of the distressed woman came to the hospital premises and gave birth | संकटात सापडलेल्या महिलेची परिचारिकांनी रुग्णालयाच्या परिसरातच येऊन केली प्रसूती

संकटात सापडलेल्या महिलेची परिचारिकांनी रुग्णालयाच्या परिसरातच येऊन केली प्रसूती

Next

अंबाजोगाई : शासकीय दवाखान्यांत परिचारिकांकडून रुग्ण व नातेवाइकांना उद्धट बोलणे, परिसरात अस्वच्छता, अशा तक्रारी अनेकवेळा ऐकावयास मिळतात. मात्र, परिचारिकांमधील सेवाभाव आणि माणुसकी जिवंत असल्याचे ताजे उदाहरण अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिचारिकांनी दाखवून दिले आहे.

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांमधील सेवाभाव व माणुसकी जिवंत असल्याचा अनुभव सातत्याने येतो. याचा नुकताच प्रत्यय शनिवारी २४ एप्रिल रोजी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आला. परिचारिकांनी एका महिलेची तत्परतेने रुग्णालयाच्या आवारातच झाडाखाली सुखरूप प्रसूती केली. पूर्ण दिवस भरलेले व प्रसूतीकळा सोसत अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा या गावावरून ही ३० वर्षीय महिला रिक्षामधून प्रसूतीसाठी आली. अत्यंतिक प्रसूती वेदनेमुळे ही महिला रस्त्यातच थांबली. ती महिला लेबररूम (प्रसूती कक्ष)पर्यंत पोहोचूच शकत नव्हती. तिची तत्काळ प्रसूती करणे आवश्यक होते. याच वेळी अधिपरिचारिका चित्रलेखा बांगर व अधिपरिचारिका रागिणी पवार अधिष्ठाता कार्यालयाकडून आपापल्या वॉर्डाकडे निघाल्या होत्या. त्यांना हा प्रकार दिसल्यानंतर त्यांनी लागलीच या महिलेला झाडाखालीच बसविले. एवढ्या वेळेत स्रीरोग तज्ज्ञही तेथे पोहोचले. त्या महिलेला वॉर्डात नेणे कठीण होते, म्हणून त्यांनी पळत जाऊन प्रसूती साहित्य आणले आणि सोबतच्या महिला नातेवाइकांना आणि इतर स्टाफला आडोसा करायला लावला. याच ठिकाणी चित्रलेखा बांगर व रागिणी पवार या दोघींनी महिलेची सुखरूप प्रसूती पार पाडली. नंतर बाळ व नवमातेला प्रसूती कक्षात हलविले व डॉक्टरांना याची कल्पना दिली. दोघांचीही प्रकृती ठणठणीत असून, त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत.

दरम्यान, सरकारी दवाखान्यांत मोफत उपचार भेटतात. पण, कागदपत्रांची पूर्तता, तपासण्या आणि त्यात आतमध्ये कर्मचारी व परिचारिकांकडून अनेकदा नातेवाइकांना बोलण्याच्या तक्रारी असतात. त्यामुळे अनेकदा ऐपत नसतानाही सामान्य लोक खासगी दवाखान्यात जातात. साधारण प्रसूतीसाठी १५ ते २० हजार, सिझेरियनसाठी ४० हजारांपर्यंत रक्कम मोजतात. मात्र, प्रत्येक गोष्टींना अपवाद असतो, हे या प्रसंगातून दिसून आले.

अनेक परिचारिका, प्रदर, वॉर्डबॉय माणुसकी आणि सेवाभाव जिवंत असलेले आहेत. त्यांच्या बळावरच शासकीय आरोग्य यंत्रणेचा कणा ताठ आहे आणि हजारो गरीब रुग्णांना मोफत उपचारही भेटत आहेत.

अशा १५ ते २० प्रसूती आम्ही केल्या आहेत. अनेक महिला कळा आल्यानंतरही घरी राहतात. उशिरा रुग्णालयात निघतात. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे लेबर रूमपर्यंत त्या पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे बाहेरच रिक्षा, रुग्णवाहिकांमध्ये त्यांची प्रसूती करावी लागते.

चित्रलेखा बांगर,

अधिपरिचारिका तथा अध्यक्षा महाराष्ट्र

राज्य परिचारिका सेवा संघ

===Photopath===

270421\5125avinash mudegaonkar_img-20210427-wa0056_14.jpg

Web Title: The nurses of the distressed woman came to the hospital premises and gave birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.