बालकांच्या सुदृढतेसाठी पोषण आहार महत्त्वाचा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:36 AM2021-09-27T04:36:26+5:302021-09-27T04:36:26+5:30
वडवणी : योग्य व सकस पोषण आहार दिल्यानंतर बालकांची वाढ अत्यंत सुदृढ व योग्यरितीने होते. प्रत्येक अंगणवाडी केंद्रातून गरोदर ...
वडवणी : योग्य व सकस पोषण आहार दिल्यानंतर बालकांची वाढ अत्यंत सुदृढ व योग्यरितीने होते. प्रत्येक अंगणवाडी केंद्रातून गरोदर तसेच स्तनदा मातांना ० ते ६ वर्षे वयोगटांपर्यंत बालकांना सकस पोषण आहार दिला जातो. यातून बालकांची शारीरिक वृद्धी होते. त्यासाठी प्रत्येक अंगणवाडीसेविका व मदतनीस यांनी जबाबदारीने प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोषण आहाराचे योग्यरितीने व वेळेत वाटप करावे, असे प्रतिपादन बीड जिल्ह्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी चंद्रशेखर केकाण यांनी केले.
वडवणी तालुक्यातील उपळी विभागांतर्गत हिवरगव्हाण येथील अंगणवाडी केंद्रात पोषण आहारविषयक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वडवणीचे बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल नरसाळे, हिवरगव्हाणचे सरपंच ईश्वर नाईकवाडे, पर्यवेक्षिका एस.ओ. करांडे, एन.आर. धबाले, पी.एस. राऊत, जे.ए. मस्के, सी.जी. म्हेत्रे यांच्यासह हिवरगव्हाण येथील अंगणवाडीसेविका, मदतनीस व महिला, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पोषण आहारविषयक स्थानिक पातळीवर उपलब्ध अन्नघटकांवर आधारित स्थानिक समुदायाला पाककृतीचे महत्त्व कृतीतून दाखवत तसेच पोषण आहारविषयक सविस्तर मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले. वडवणीचे बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल नरसाळे व इतर पर्यवेक्षिका यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.