पीककर्ज वाटपासाठी बँकांकडून अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:36 AM2021-08-27T04:36:23+5:302021-08-27T04:36:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : शहरातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अरेरावी करुन शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. अशी तक्रार येल्डा ...

Obstacles from banks for disbursement of peak loans | पीककर्ज वाटपासाठी बँकांकडून अडवणूक

पीककर्ज वाटपासाठी बँकांकडून अडवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : शहरातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अरेरावी करुन शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. अशी तक्रार येल्डा येथील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. यात बदल न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला आहे.

शहरातील स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयीकृत बँकांत शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. शेतकरी व ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक देणे तर दूरच, उलट अपमानास्पद वागणूक या बँकांत मिळत आहे. या बँकांनी पीककर्जाचे वाटप केले नाही. अनेकांच्या कर्जाच्या फायली कुठले तरी कारण काढून पेंडिंग ठेवल्या असल्याची तक्रारही या शेतकऱ्यांनी केली आहे. एका कामासाठी अनेक चकरा मारायला लावून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न बँकेतील कर्मचाऱ्यांकडून होत आहे. या तक्रारीवरून कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही या ग्रामस्थांनी दिला आहे. तरी उपविभागीय अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे.

260821\img-20210826-wa0026.jpg

पीक कर्जाबाबत बँकांकडून शेतक-यांची अडवणूक होत असल्याच्या तकारीचे निवदेन उपजिल्हाधिका-यांना देण्यात आले?.

Web Title: Obstacles from banks for disbursement of peak loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.