रहदारीस अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:41+5:302021-06-05T04:24:41+5:30
बांधकाम साहित्य रस्त्यावरच अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम करताना लागणारी वाळू, खडी, विटा हे ...
बांधकाम साहित्य रस्त्यावरच
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम करताना लागणारी वाळू, खडी, विटा हे बांधकाम साहित्य सातत्याने रस्त्यावरच टाकण्यात येते. परिणामी शहरवासीयांना रस्त्यावरून येता जाताना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ढिगाऱ्यातील वाळू रस्त्यावर पसरत असल्याने दुचाकी वाहने घसरू लागली आहेत. यामुळे लहान मोठ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यावर बांधकामाचे साहित्य टाकणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
पथदिवे बसविण्याची मागणी
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील आनंदनगर परिसरात व मेडिकल कॉलेज या मुख्य रस्त्यावर पथदिवे बसवावेत. हा मुख्य रस्ता रुग्णालयाकडे जाणारा असल्याने रात्रीच्या वेळीही या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अंधारामुळे गैरप्रकार उद्भवू नये यासाठी या मुख्य रुस्त्यावर पथदिवे बसविण्यात यावेत, अशी मागणी मनसेचे उपजिल्हाप्रमुख सुनील जगताप यांनी केली आहे.