तहसील प्रशासनाकडून निराधारांची अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:33 AM2021-03-31T04:33:54+5:302021-03-31T04:33:54+5:30
धारूर : वयाचे स्वयंघोषणापत्र पुर्वीप्रमाणे ग्राह्य धरून निराधारांचे अर्ज तात्काळ मंजूर करावेत अशी मागणी तालुका निराधार योजना समितीचे ...
धारूर : वयाचे स्वयंघोषणापत्र पुर्वीप्रमाणे ग्राह्य धरून निराधारांचे अर्ज तात्काळ मंजूर करावेत अशी मागणी तालुका निराधार योजना समितीचे सदस्य शिवाजी काळे यांनी केली आहे.
येथील तहसील कार्यालयात अनेक व्यक्तींनी निराधार योजनेचे मानधन मिळावे यासाठी जून ते ऑक्टोबर पर्यंत अनेक अर्ज भरले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे वैद्यकीय अधीक्षकांच्या प्रमाणपत्राऐवजी स्वयंघोषणा पत्र देण्याचे कायद्याने सांगितले आहेत. त्याप्रमाणे अनेक गरीब, वृद्ध, विधवा, महिला, पुरुषांनी स्वयंघोषणापत्र व मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक ,नगरसेवकांच्या सह्या घेऊन अर्ज तहसील कार्यालयात दाखल केले आहेत. यापूर्वी झालेल्या बैठकीत स्वयं घोषणा पत्राच्या आधारे तहसीलने निराधारांचे अर्जही मंजूर केले आहेत. मात्र या बैठकीत स्वयंघोषणापत्र लावलेले अर्ज बाजूला काढून ठेवून या अर्जावर वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडणे, अशी त्रुटी काढण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज मंजूर करून आता वेगळा न्याय का या निराधारांची अडवणूक थांबवून स्वयं घोषणा पत्राआधारे त्यांचे अर्ज मंजूर करावेत अशी मागणी या समितीचे सदस्य शिवाजी काळे यांनी केली आहे.