अंबाजोगाई नगर परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला २ हजाराची लाच घेताना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 08:14 PM2023-04-18T20:14:16+5:302023-04-18T20:14:42+5:30

पीटीआरवर नोंदणी घेण्यासाठी घेतली लाच

Office Superintendent of Ambajogai Nagar Parishad caught accepting bribe of Rs | अंबाजोगाई नगर परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला २ हजाराची लाच घेताना पकडले

अंबाजोगाई नगर परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला २ हजाराची लाच घेताना पकडले

googlenewsNext

अंबाजोगाई : अंबाजोगाई नगर परिषदेत वडिलोपार्जित घराची नोंद करण्यासाठी पीटीआरवर नोंदणी घेण्यासाठी  परिषदेतील कार्यालयीन अध्यक्षकाने लाचेची मागणी केली. दोन हजाराची लाच स्विकारताना बीड एसीबीच्या टिमने मंगळवारी दुपारी  रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्माराम जीवनराव चव्हाण (रा.अंबाजोगाई जि. बीड) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. चव्हाण हे अंबाजोगाई नगर पालिकेत कार्यालयीन अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या व वडिलांचे नावे असलेले वडिलोपार्जित घराची मालकी हक्क वडिलांनी सोडून दिल्यामुळे तक्रारदार यांनी मालकी हक्कात वडिलांचे नाव कमी करुन स्वत: चे नाव नोंदणीचा फेर पीटीआरवर घेण्यासाठी कायदेशीर शुल्क म्हणून तीन हजार व लाच म्हणून स्वत: साठी तीन हजार अशी सहा हजार रुपयांची मागणी केली. तडजोडअंती पाच हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तीन हजार रुपये शुल्क भरायला लावल्यानंतर लाच रक्कम दोन हजार स्वीकारतांना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई न. प. कार्यालयातील कार्यालयीन कक्षात ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलीस अंमलदार हनुमान गोरे, संतोष राठोड, अमोल खरसाडे, गणेश मेहेत्रे यांनी केली.

 

Web Title: Office Superintendent of Ambajogai Nagar Parishad caught accepting bribe of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.