सिलिंडर स्वस्ताई नावालाच २२५ च्या जखमेवर अवघ्या १० रुपयांचे मलम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:34 AM2021-04-04T04:34:47+5:302021-04-04T04:34:47+5:30

बीड : मागील वर्षात दिवाळीनंतर पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाच्या दरात भडका उडालेला असतानाच गॅस सिलिंडरच्या दरातही कमालीची वाढ झाली. वर्षभरात ...

Ointment for only Rs 10 on a 225 wound in the name of cylinder cheapness | सिलिंडर स्वस्ताई नावालाच २२५ च्या जखमेवर अवघ्या १० रुपयांचे मलम

सिलिंडर स्वस्ताई नावालाच २२५ च्या जखमेवर अवघ्या १० रुपयांचे मलम

Next

बीड : मागील वर्षात दिवाळीनंतर पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाच्या दरात भडका उडालेला असतानाच गॅस सिलिंडरच्या दरातही कमालीची वाढ झाली. वर्षभरात २२५ रुपयांची वाढ झाल्यानंतर स्वयंपाक करणे महाग झाले. सर्वच घटकातून वाढत्या महागाईला विरोध होऊ लागल्याने अर्थसंकल्पात या बाबीकडे दुर्लक्ष झालेे; परंतु १ एप्रिल रोजी घरगुती गॅस सिलिंडरचे नवे दर लागू करण्यात आले. सर्वच ठिकाणी हे दर दहा रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे २२५ रुपयांनी महाग झालेले सिलिंडर केवळ दहा रुपयांनी स्वस्त झाले आहे. मागील तीन महिन्यांत २२५ रुपयांची दरवाढ झाल्याने सर्वसामान्य होरपळत असताना त्यांच्या जखमेवर १० रुपयांचे मलम लावण्यात आले. दरवाढ कमी केल्याचा गवगवा मात्र जोरदार झाला. ही तर सरकारची चालाखीच म्हणावी लागेल, अशा प्रतिक्रिया गृहिणींनी व्यक्त केल्या.

------

जीवनावश्यक वस्तूंचे दर एक तर स्थिर नाहीत. खाद्यतेलाचे भाव दर आठवड्याला वाढत गेले. गॅस सिलिंडरचे दरही खूप वाढले. दहा रुपये कमी करणे म्हणजे मखलाशी वाटते. - नभा देशमुख, गृहिणी

-----------

अडीचशे रुपयांपर्यंत सिलिंडरचे भाव वाढेपर्यंत कोणतेच नियंत्रण ठेवले नाही. आणि नंतर केवळ १० रुपये कमी केले ही कसली स्वस्ताई? तेही केले नसते तरी चालले असते. याचा काय फायदा? - ललिता विणकर, गृहिणी

----------

सिलिंडरची दहा रुपये स्वस्ताई नावालाच आहे. सरकारने कोहळा काढून आवळा हाती दिला आहे. महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्यांनी जगायचे कसे? - सुनीता सुरवसे, गृहिणी

-------

अशी झाली दरवाढ

नोव्हेंबर २०२० - ६२०डिसेंबर २०२० -६२०

जानेवारी ७२०

फेब्रुवारी ७४५

मार्च ८४५

एप्रिल ८३५

-------

मागील वर्षातील शेवटचे दोन महिने सिलिंडरचे दर सारखेच होते. मात्र जानेवारी उजाडताच सिलिंडरचे दर १०० रुपयांनी वाढून ७२० वर पोहचले. फेब्रुवारीत आधी २५ तर नंतर ५० अशी ७५ रुपयांची दरवाढ होऊन सिलिंडरचे भाव ७९५ झाले. त्यानंतर मार्चमध्ये ५० रुपयांनी दरवाढ झाली. सिलिंडर ८४५ रुपयांना झाले. एप्रिलमध्ये अवघे दहा रुपये कमी झाले.

Web Title: Ointment for only Rs 10 on a 225 wound in the name of cylinder cheapness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.