दीड हजार शिक्षकांनी घेतली नाही लस; मुले शाळेत पाठवायची कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:40 AM2021-09-09T04:40:14+5:302021-09-09T04:40:14+5:30

बीड : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी ५ सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आली होती. तरीही बीड जिल्ह्यात ...

One and a half thousand teachers did not take the vaccine; How to send children to school? | दीड हजार शिक्षकांनी घेतली नाही लस; मुले शाळेत पाठवायची कशी?

दीड हजार शिक्षकांनी घेतली नाही लस; मुले शाळेत पाठवायची कशी?

Next

बीड : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी ५ सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आली होती. तरीही बीड जिल्ह्यात अद्याप १२६२ शिक्षक आणि ३२१ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीकरण केलेले नाही. त्यामुळे शाळा उघडण्यात अडचणी आहेत. १५८३ शिक्षक व कर्मचाऱ्यांचे लसीकरण राहिल्याने त्यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. तर राहिलेले लसीकरण पाहता मुलांना शाळेत पाठवायचे कसे ? , असा प्रश्न पालकांना सतावत आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम वेगाने होत असलातरी अनेक ठिकाणी लस वेळेवर उपलब्ध होत नाही. लस घेण्यासाठी गेलेतरी ताटकळावे लागते. दुसरीकडे बहुतांश शिक्षकांचे विविध आजारांमुळे उपचार सुरू आहेत. गंभीर आजारांवरील उपचार सुरू असताना लस घेण्याबाबत खात्रीशीर वैद्यकीय सल्ला मिळत नसल्याने काही शिक्षकांनी लस घेण्याचे टाळले आहे. या संदर्भात सविस्तर अहवाल मागवून संबंधित शिक्षकांच्या लसीकरणाबाबत शिक्षण विभाग दोन्ही पातळीवर पाठपुरावा करणार आहे.

जिल्ह्यातील एकूण शिक्षक - २२८८६

पहिला डोस घेतलेले शिक्षक - २८८९

दोन्ही डोस घेतलेले शिक्षक - १८७८५

लस न घेतलेले शिक्षक - १२६२

जिल्ह्यातील एकूण शिक्षकेतर कर्मचारी - ४७९

पहिला डोस घेतलेले शिक्षकेतर कर्मचारी - ७८९

दोन्ही डोस घेतलेले शिक्षकेतर कर्मचारी - ३०७२

लस न घेतलेले शिक्षकेतर कर्मचारी - ३२१

२) कोणत्या तालुक्यात किती?

तालुका शिक्षक पहिला डोस घेतलेले दुसरा डोस घेतलेले लस न घेतलेले शिक्षकेतर कर्मचारी पहिला डोस घेतलेले दुसरा डोस घेतलेले लस न घेतलेले

अंबाजोगाई २४७८ २४८ २१२८ १०२ ६२२ ८३ ४६३

आष्टी २२०३ २८० १८५७ ६६ ४६६ ८५ ३६१

बीड ५०९२ ८२७ ३७९८ ४६७ १०३६ १२० ८४१

धारूर ९७२ ९८ ८३८ ३६ २५७ ८७ १५८

गेवराई २६३६ ४३५ २००२ १९९ ३९० २१९ १२६

केज २१५७ १६३ १९४२ ५२ ५७२ ३९ ५१६

माजलगाव १९१६ ११६ १७३० ७० ९८ १० ७६

परळी २३२७ ५६२ १६२९ १३६ ३३५ १२७ १८३

पाटोदा ११८६ ८८ १०७३ २५ १८८ ३४ १४१

शिरूर कासार १२०४ ०३ १११५ ८६ ११३ ०२ १०५

वडवणी ७१५ ६९ ६२३ २३ १०२ ०० १०२

३) लस न घेतलेल्यांचे काय?

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होईल. गंभीर आजार, ॲलर्जी असणारे वगळून उर्वरित शिक्षक- कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचित केलेले आहे. लसीकरणाबाबत वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे.

- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा), बीड.

------------

Web Title: One and a half thousand teachers did not take the vaccine; How to send children to school?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.