अकरा गावात एकाच दिवशी अँटिजन चाचणी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:34 AM2021-05-12T04:34:28+5:302021-05-12T04:34:28+5:30
शिरुर कासार : तालुक्यात एकाच दिवशी मंगळवारी अँटिजन चाचणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी ४५७ नागरिकांची तपासणी केली असता २१ ...
शिरुर कासार : तालुक्यात एकाच दिवशी मंगळवारी अँटिजन चाचणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी ४५७ नागरिकांची तपासणी केली असता २१ कोरोनाबाधित रुग्ण निष्पन्न झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही लक्षण दिसताच तपासणी करून वेळीच सावध झाल्यास धोका टाळता येतो,परंतु सर्दी,ताप , खोकला आदी आजाराला सामान्य आजार समजून तपासणी न करताच इलाज करण्यावर अनेकांचा भर असतो. त्यात कोरोना बळावतो व पुढे धोका संभवतो. हे सर्व टाळण्यासाठी आरोग्य विभागाने आता अधिक रुग्ण असलेल्या बाधित गावात शिबिराचे आयोजन करून कोरोना चाचणी मोहीम सुरू केली. मंगळवारी जाटनांदूर,आनंदगाव ,नांदेवली ,माळेवाडी ,खोपटी ,मोरजळवाडी ,चाहुरवाडी ,विघनवाडी,पांगरी,बावी व मातोरी या गावांमध्ये कोरोना चाचणी शिबिरात ४५७ नागरिकांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यात ३२१ पुरुष व १३६ महिलांची तपासणी केली असता १६ पुरुष व ५ महिला असे एकूण २१ पाॅझिटिव्ह आढळून आले. अँटिजन चाचणीसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचारी म्हणून सुदर्शन गाडे , डॉ.संतोष आरेकर,हरी घोडके,सांगळे,शिंदे,बांगर,पी. के.सानप ,गणेश पांगरे, डॉ.प्रशांत पारगावकर यांनी कार्यवाटपाप्रमाणे संबंधित गावात तपासणी केली.
===Photopath===
110521\vijaykumar gadekar_img-20210511-wa0072_14.jpg