टँकर आणि टेम्पो अपघातात एकजण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 07:30 PM2020-07-07T19:30:51+5:302020-07-07T19:31:22+5:30
बीड-कडा-नगर रोडवरील धानोरा वळणावर घडली घटना
Next
कडा : धानोरा येथील बीड-कडा-नगर रोडवरील वळणावर मंगळवारी दुपारी टँकर व मालवाहू टेम्पोची समोरासमोर धडक झाली. यात मालवाहू टेम्पोच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. अनिस जमाल शेख (४० ) असे मृत चालकाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील अनिस शेख हा मालवाहू टेम्पोमधून ( MH23, Au 2670 ) नगरच्या दिशेने जात होता. दरम्यान, नगरवरून आष्टी कडे येत असलेला टँकरसोबत ( MH.16, G. 5900 ) त्यांची समोरासमोर धडक झाली. यात चालक अनिस शेख यांचा जागीच मृत्यू झाला.