पंचक्रोशीत एकच चर्चा! मातृभावाने हाडवैरावर मात,श्वानाच्या कुशीत होतेय मांजराच्या पिलाची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 06:03 PM2022-06-08T18:03:43+5:302022-06-08T18:13:40+5:30
आता दोघांनाही एकमेकांचा चांगलाच लळा लागलेला आहे.
धारूर (बीड) : मांजर व कुत्रा या दोन प्राण्यांमधील हाडवैर सर्वश्रुत आहे. पण धारूर तालूक्यातील पांगरी शिवारात सामाजीक कार्यकर्ते संदीपान थोरात यांच्या शेतात या दोघांतील कमालीचे जिव्हाळ्याचे संबंध दिसून येत आहेत. मांजरीच्या पिल्लास श्वान दुध पाजत असल्याचे हे दोन्ही दुर्मिळ दृश्य पाहून ग्रामस्थ आर्श्चय व्यक्त करत आहेत. करुणा आणि मैत्रीभाव अंगी असल्यांस वैर कायमचे संपवता येते याची प्रचीती हे दृष्य पाहिल्यास नक्कीच येते.
बीड: पंचक्रोशीत एकच चर्चा! श्वानाच्या कुशीत होतेय मांजराच्या पिलाची वाढ pic.twitter.com/d72bZFdeFy
— Lokmat (@lokmat) June 8, 2022
चार महिन्यांपूर्वी तालूक्यातील पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीपान थोरात यांच्या शेतातील पाळीव श्वानाचे पिल्लू दोनच दिवसांत दगावले. तर शेतातीलच रानमांजरीचा पिल्ल्यास जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला. मात्र, यानंतर श्वानातील मातृत्व जागे होऊन तिने पिलास मायेने जवळ घेतले. ऐवढेच नव्हे तर ते मांजरीचे पिल्लू श्वानाच्या कुशीत बसून दुध प्राशन करू लागले. आता दोघांनाही एकमेकांचा चांगलाच लळा लागलेला आहे. हाडवैर सोडून दोन्ही प्राण्यांमध्ये करुणा आणि मैत्रीची भावना निर्माण करण्यात संदीपान थोरात यशस्वी झाले आहेत. दोन्ही पाळीव प्राणी आता कायम सोबत दिसत असल्याने याची पंचक्रोशीत चर्चा होत आहे.