वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथे शॉर्टसर्किटमुळे दीड एकर ऊस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 07:21 PM2018-12-04T19:21:02+5:302018-12-04T19:21:48+5:30

चिंचोटी शिवारातुन वीज वितरणाचे खांब काही शेतकऱ्यांच्या जमिनीतून गेलेले आहेत.

One-half acre sugarcane crop burnt by short circuit in Chinchoti in Wadvani taluka | वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथे शॉर्टसर्किटमुळे दीड एकर ऊस खाक

वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथे शॉर्टसर्किटमुळे दीड एकर ऊस खाक

Next

वडवणी ( बीड ) : तालुक्यातील चिंचोटी येथील शेतकरी आण्णासाहेब सुंदरराव गोंडे यांच्या शेतातील दीड एकर ऊस शॉर्टसर्किटने जाळून खाक झाला. ही घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे.

चिंचोटी शिवारातुन वीज वितरणाचे खांब काही शेतकऱ्यांच्या जमिनीतून गेलेले आहेत. त्यामुळे येथे काही ना काही घटना घडतच असतात. मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास  शिवारातील गट नंबर २६ मधील आण्णासाहेब गोंडे यांच्या शेतातील विजेच्या खांबावरील तारेमध्ये घर्षण होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे जाळ होऊन उसाला आग लागली. त्यामुळे या आगीत दीड एकर ऊस जाळून खाक झाला. यामध्ये शेतकऱ्याचे लाखाचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचा तातडीने पंचनामा करून शेतकरी यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.

महावितरणाच्या गलथान कारभारामुळे  ग्रामीण भागात महावितरणाच्या विद्युत वाहिन्या जुन्या व अक्षम बनल्या आहेत. लोबकळणा-या तारा यामुळे अनेक ठिकाणी पिके जळून खाक होत आहेत. महावितरणाच्या  दुर्लक्षामुळे तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीत मोठ्या प्रयत्नांनी जोपासलेली पिके धोक्यात सापडली आहेत. शॉर्ट सर्किटच्या वाढत्या घटनांमुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
 

Web Title: One-half acre sugarcane crop burnt by short circuit in Chinchoti in Wadvani taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.