एक घर, दोन गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:38 AM2021-09-12T04:38:21+5:302021-09-12T04:38:21+5:30

एक दोन तीन चार... गणपतीचा जयजयकार... ताशांचा आवाज तर्रार्रा झाला नि गणपती माझा नाचत आला... मंगलमूर्ती मोरया... जयघोषांच्या निनादाचे ...

One house, two Ganapatis | एक घर, दोन गणपती

एक घर, दोन गणपती

Next

एक दोन तीन चार... गणपतीचा जयजयकार... ताशांचा आवाज तर्रार्रा झाला नि गणपती माझा नाचत आला... मंगलमूर्ती मोरया... जयघोषांच्या निनादाचे हे स्वर सकाळ झाली तरीही मूषकाच्या कानात रुंजी घालत होते. भक्तांच्या उत्साहात मूषकालाही ठेका धरण्याचा मोह आवरता आला नव्हता. दमून गेलेल्या मूषकाने

आळस झटकतच पांघरूण बाजूला सारले. मूषकाने मोबाईल सुरू करताच क्षणी बाप्पांच्या मिसकॉलचे नोटिफिकेशन मेसेज एकामागून एक धडकले. बाप्पा रागावणार याची त्यास कल्पना होतीच, काही मिनिटांत तयार होऊन मूषक शेपटी हलवत दरबाराच्या दारात दाखल झाला. बाप्पा घड्याळाकडे पाहत दरबारात चकरा मारत होते. महाराज,

आजचे पेपर वाचले का?, किती झकास दिसताय तुम्ही... आहाहा... तुम्ही मंगलमूर्ती... स्वागत सोहळ्यातून दिसे तुमची कीर्ती... असे म्हणतच मूषकाने एंट्री केली. मूषकाची लाडीगोडी बाप्पांनी ओळखून घेतली अन् शेड्यूलबाबत विचारणा केली. महाराज, शेड्यूल तयार आहे, पण.

थेट आजचे प्रोग्राम काय ते सांग... असा प्रश्न केला. महाराज, शेड्यूल तयार आहे... पण. मूषक थबकल्याने बाप्पा कोड्यात पडले. बाप्पांनी भुवया उंचावत त्याच्याकडे कटाक्ष टाकला तेव्हा मूषक टुणकन उडी मारून त्यांच्या कानाजवळ गेला. महाराज, तुम्ही एक गाव, दोन गणपती ऐकून असाल. हे बीड आहे. इथं एक घर अन् दोन गणपती... बाप्पांना काहीच उमगेना. एक गाव, एक गणपती ऐकून आहे, एक घर, दोन गणपती काय, बाप्पांनी मूषकाचे कान पकडून विचारले. कान सोडा... सांगतो सांगतो.. म्हणत मूषकाने बाप्पांचे पाय धरले. बाप्पांनी त्याचा कान सोडला अन् स्वत:चे कान सुपासारखे केले. मूषक दोन पावले मागे सरकला अन्

एक आहे बंगला... सत्तेत रंगला... एवढेच पुटपुटला. बाप्पांनी सोेंड पुढे करून त्यास जवळ खेचले अन् हातात मोदक ठेवला तसा मूषक खुलला.

महाराज, अहो घर एक अन् पदे अनेक. माजी मंत्री, आमदार, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक.... ‘अरे बस... बस... किती लांबलचक यादी... कळलं कळलं...’ असे म्हणत बाप्पा खुदकन् हसले अन् मूषकाला थांबवले. एवढ्यात नगर रोडवरून सुखकर्ता... दु:खहर्ता...चे दोन सूर एकाचवेळी कानी पडले अन् बाप्पा व मूषक परस्परांकडे एकटक पाहतच राहिले.

.....

? ;

!

Web Title: One house, two Ganapatis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.