कार अपघातात एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:22 AM2021-07-12T04:22:04+5:302021-07-12T04:22:04+5:30

बीड : गेवराई तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर हयगयीने व निष्काळजीपणे कार चालवून कारमधील देविदास भानुदास गाडेकर (रा.हसनाबाद, जि.औरंगाबाद) यांच्या ...

One killed, two injured in car accident | कार अपघातात एक ठार, दोन जखमी

कार अपघातात एक ठार, दोन जखमी

googlenewsNext

बीड : गेवराई तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर हयगयीने व निष्काळजीपणे कार चालवून कारमधील देविदास भानुदास गाडेकर (रा.हसनाबाद, जि.औरंगाबाद) यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालक विठ्ठलसिंग रूपसिंग जारवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ८ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेत कारमधील बद्रीनाथ लक्ष्मण गाडेकर व गणेश सुखदेव गाडेकर हे जखमी झाले. मयताचा भाऊ रमेश गाडेकर यांनी या प्रकरणी गेवराई ठाण्यात १० जुलै रोजी फिर्याद दिली. तपास पोह.राठोड करीत आहेत.

-----------

जनावरे चारण्यावरून भांडण, एकाचे डोके फोडले

बीड : शेतात जनावरे चारण्यास मज्जाव केल्याने, रावसाहेब लक्ष्मण जायभाये यांना मारहाण करून, दगड मारून डोके फोडून जखमी केल्याची घटना शिरुर तालुक्यातील दगडवाडी येथे घडली. ९ जुलै रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी १० जुलै रोजी फिर्याद दिल्याने विष्णू अर्जुन बिनवडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोह.गर्जे करीत आहेत.

--------------

Web Title: One killed, two injured in car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.