शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एक लाखाचा ऊस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:40 AM2021-09-17T04:40:44+5:302021-09-17T04:40:44+5:30
अंबाजोगाई तालुक्यातील तडोळा येथे महावितरणच्या विजेच्या तारा अनेक दिवसांपासून लोंबकळत आहेत. गुरुवारी दुपारी तारा एकमेकांवर घासून लागलेल्या आगीत शेतकरी ...
अंबाजोगाई तालुक्यातील तडोळा येथे महावितरणच्या विजेच्या तारा अनेक दिवसांपासून लोंबकळत आहेत. गुरुवारी दुपारी तारा एकमेकांवर घासून लागलेल्या आगीत शेतकरी अशोक गोविंदराव कदम यांच्या गट नं. एकमधील ऊसाला आग लागली. या आगीत अर्धा एक्कर ऊस जळून कदम यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. लागलेली आग शमविण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली.
शेताच्या लगतच झोपडपट्टी
तडोळा येथे जिथे ऊसाला आग लागली. त्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावरच झोपडपट्टी आहे. ग्रामस्थांनी लागलेली आग तत्काळ आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. अन्यथा मोठ्या दुर्घटनेचा सामना करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली होती. महावितरणने लोंबकाळणाऱ्या तारांची दुरुस्ती करावी. जळालेल्या ऊसाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी अशोक कदम यांनी केली आहे.
160921\185-img-20210916-wa0051.jpg
जळालेला ऊस