एकाचदिवशी एक लाखाची देशी-विदेशी दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:35 AM2021-05-06T04:35:26+5:302021-05-06T04:35:26+5:30
बीड : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंबाजोगाई पथकाने ४ मे रोजी दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तेलगाव येथे धाड ...
बीड : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंबाजोगाई पथकाने ४ मे रोजी दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तेलगाव येथे धाड टाकून ७० हजार रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली; तर पाटोदा तालुक्यातील वैजाळा येथे लपवून ठेवलेली ४६ हजार रुपयांची देशी दारू बीडच्या पथकाने जप्त केली.
सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केले असून, अवैध मद्याची विक्री होऊ नये, याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके जिल्हाभरात करडी नजर ठेवत आहेत. जिल्हाभरात धाडसत्र राबवित आहेत. ४ मे रोजी अंबाजोगाईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दिंद्रुड पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना तेलगाव (ता. धारूर) येथे रस्त्याकडेला मोकळ्या जागेत इसम नामे दामोदर माणिक चव्हाण (रा. तेलगाव, ता. धारूर) हा विदेशी मद्याचा साठा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याचे आढळून आले. त्याच्या ताब्यातून राज्य उत्पादन शुल्क विभागाने व्हिस्कीच्या १८९ मिलीच्या ४८९ बाटल्या असा एकूण ६९ हजार ६९० रुपयांचा विदेशी मद्याचा साठा हस्तगत केला. तसेच त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ चे कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई परिविक्षाधीन उपअधीक्षक इंगळे, अंबाजोगाईचे दुय्यम निरीक्षक आल्हाट, जवान धस व पाटील व जवान तथा वाहनचालक डुकरे यांनी केली.
गंजीत लपविली देशी दारू
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बीड पथकाने ४ मे रोजी पाटोदा तालुक्यातील वैजाळा शिवारात एका शेतात कडब्याच्या गंजीमध्ये लपवून ठेवलेला देशी दारूचा साठा जप्त केला. तसेच आरोपी नीलेश भागवत येडे (रा. वैजाळा, ता. पाटोदा) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातून देशी दारू संत्रा या ब्रँडच्या १८० मिली क्षमतेच्या ७६८ सीलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या दारूची किंमत ४६ हजार ८० रुपये आहे. ही कारवाई निरीक्षक कडवे, दुय्यम निरीक्षक शेळके, राठोड, घोरपडे व जवान अमीन सय्यद, मोरे व वाहनचालक जारवाल व शेळके यांनी केली.
ढाबे, हॉटेल, खानावळींची तपासणी
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यातील हातभट्टी ठिकाणे, रोडलगत असलेले ढाबे, हॉटेल, खानावळी आदींची सातत्याने तपासणी करण्यात येत असून, अवैध मद्याची विक्री किंवा निर्मिती होत असल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा नितीन धार्मिक, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, बीड यांनी दिला आहे.
===Photopath===
050521\05_2_bed_6_05052021_14.jpg~050521\05_2_bed_5_05052021_14.jpg
===Caption===
कारवाई~कारवाई