बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एक हजार कोटींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:33 AM2021-03-16T04:33:14+5:302021-03-16T04:33:14+5:30
शासन बँकच नव्हे तर सार्वजनिक क्षेत्रातील जवळपास १०० विविध क्षेत्रांची मालकी विकून त्यांना मोठ्या उद्योजकांच्या हाती विकू पाहत ...
शासन बँकच नव्हे तर सार्वजनिक क्षेत्रातील जवळपास १०० विविध क्षेत्रांची मालकी विकून त्यांना मोठ्या उद्योजकांच्या हाती विकू पाहत आहे, असे झाले तर सर्वांत जास्त नुकसान हे सर्वसामान्य जनतेला होणार आहे. निश्चलिकरण, जनधन, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम यांसारख्या विविध सरकारी योजना खासगी बँकेच्यामार्फत राबविल्या जात नाहीत, त्यामुळे सामान्य नागरिक बँकिंग सुविधेच्या वर्तुळाबाहेर फेकला जाईल. खासगीकरण झाल्यास महागाईसोबतच इतरही गोष्टींचे मूल्य वाढणार आणि त्याचा बोजा हा मध्यम व गरीब जनतेच्या खिशावर पडेल, असे यावेळी सांगण्यात आले.
-------
एटीएमचा आधार तोकडा
संपामुळे नागरिकांनी एटीएमचा आधार घेतला. मात्र, सलग चार दिवस बँक बंद राहणार असल्याने एटीएमवर ताण पडला. काही ठिकाणी गर्दी तर काही ठिकाणी खडखडाट असा अनुभव आल्याचे ग्राहकांनी सांगितले.
----
ऑनलाइन बँकिंगचा आधार
संपामुळे अनेक व्यापाऱ्यांनी ऑनलाइन बँकिंगद्वारे व्यवहार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. युपीआय ट्रान्सफर सिस्टीमचे अपग्रेडिंग सुरू असल्याने या अडचणी आल्या असाव्यात, असे सांगण्यात येत होते.
----
हे व्यवहार होते ठप्प
बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरटीजीएस, मनी ट्रान्सफर, क्लिअरिंग तसेच रोखीचे व्यवहार ठप्प हाेते. संपामुळे जिल्ह्यात एक हजार कोटी रूपयांची उलाढाल ठप्प झाली.
---
===Photopath===
150321\152_bed_21_15032021_14.jpeg~150321\152_bed_20_15032021_14.jpeg
===Caption===
बँक कर्मचारी संप~बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बीड जिल्ह्यातील सर्व सरकारी बँका बंद होत्या. नगर रोड येथील महाराष्ट्र बँकेसमोर बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कोविड नियमांचे पालन करीत हाती फलक दर्शवित खाजगीकरणाचा विरोध केला.