पोलिसाकडून लाच घेणाऱ्या सहायक फौजदाराला एक वर्ष सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 12:19 AM2020-01-03T00:19:13+5:302020-01-03T00:20:01+5:30

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणात पत्नी व मुलांची नावे वगळण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी आपल्याच ठाण्यात कार्यरत बीट अंमलदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षकाला एक वर्ष सक्त मजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रमुख सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या न्यायालयाने सुनावली.

One year of forced labor to the police officer who took bribe | पोलिसाकडून लाच घेणाऱ्या सहायक फौजदाराला एक वर्ष सक्तमजुरी

पोलिसाकडून लाच घेणाऱ्या सहायक फौजदाराला एक वर्ष सक्तमजुरी

Next
ठळक मुद्देपाच हजार रुपये दंड : प्रमुख सत्र न्यायाधीशांनी सुनावली शिक्षा

बीड : पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणात पत्नी व मुलांची नावे वगळण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी आपल्याच ठाण्यात कार्यरत बीट अंमलदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षकाला एक वर्ष सक्त मजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रमुख सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या न्यायालयाने सुनावली.
अंभोरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कैलास भाऊराव थोरवे यांच्यासह पत्नी व मुलावर एन.सी. दाखल झाली होती. या प्रकरणात पत्नी आणि मुलांची नावे वगळण्यासाठी तसेच प्रतिबंधक कारवाई टाळण्यासाठी याच पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास ढोले याने ५ हजार रुपयांची लाच मागितली. सदर लाच देण्याची मानसिकता नसल्याने या प्रकरणी कैलास थोरवे यांनी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात ढोले याच्याविरूध्द १० आॅक्टोबर २०१२ मध्ये तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने लाचेची पडताळणी करून आष्टी तालुक्यातील धानोरा बस स्टॉपवर ११ आॅक्टोबर २०१२ रोजी सापळा रचला. धानोरा येथील एका चहाच्या टपरीवर ४ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात कलम ७, १३(१), (ड) प्रमाणे गुन्हा दाखल होऊन दोषारोपपत्र बीड येथील प्रमुख सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांची मंजुरी घेऊन पंच सचिन जोगदंड, तक्रारदार कैलास थोरवे, तपासी अधिकारी सुरेश चाटे यांच्या साक्षी नोंदविल्या. या साक्षी पुराव्यावरून आरोपी विलास ढोले यास दोषी धरून एक वर्षे सक्तमजूरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अ‍ॅड. मिलींद वाघीरकर यांनी काम पाहिले.

Web Title: One year of forced labor to the police officer who took bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.