युवकाला लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:27 AM2020-12-25T04:27:16+5:302020-12-25T04:27:16+5:30

बीड : ‘फोन पे’वरून पाठविलेले पाच हजार रुपये खात्यावर जमा झाले नाहीत. त्यामुळे बीडच्या एका युवकाने इंटरनेटवरून ‘फोन पे’च्या ...

An online bribe of Rs | युवकाला लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा

युवकाला लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा

Next

बीड : ‘फोन पे’वरून पाठविलेले पाच हजार रुपये खात्यावर जमा झाले नाहीत. त्यामुळे बीडच्या एका युवकाने इंटरनेटवरून ‘फोन पे’च्या बनावट कस्टमर केअरचा नंबर गुगलवरून घेतला. त्यानंतर भामट्याने चुकीची माहिती देत त्या युवकाच्या खात्यावरून एक लाख रुपये काढून घेतल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले असून, पोलिसांपुढे या भामट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान कायम आहे.

फसवणुकीचा हा प्रकार १४ डिसेंबर रोजी घडला होता. बाजीराव सुंदर जाधव (रा. संत नामदेवनगर, धानोरा रोड, बीड) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा भाऊ दत्ता मोहन जाधव याने १४ डिसेंबर रोजी बाजीरावच्या फोन नंबरवर पाच हजार रुपये पाठविले होते. परंतु, ही रक्कम बाजीरावला मिळाली नाही. त्यामुळे त्याबाबत तक्रार करण्यासाठी त्याने इंटरनेटवर ‘फोन’पे च्या कस्टमर केअरचा नंबर गुगलवर शोधला असता त्याला फोनपेच्या बनावट कस्टमर केअरचा नंबर मिळाला. त्या नंबरवरून बोलणाऱ्या राहुलकुमार या भामट्याने बाजीरावला बोलण्यात गुंतवून आधी त्याच्या खात्यावरील शिल्लक रक्कम विचारून घेतली. त्यानंतर बाजीरावला चुकीची माहिती देत फोन पेद्वारे त्याच्या खात्यातून ९८ हजार ८५२ रुपये काढून घेतले आणि २४ तासांत ही रक्कम पुन्हा खात्यावर जमा होईल, असे सांगितले. परंतु, आठ दिवसानंतरही पैसे जमा न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे बाजीरावच्या लक्षात आले. याप्रकरणी बाजीराव जाधव याच्या फिर्यादीवरून राहुलकुमार नामक भामट्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक ठोंबरे करीत आहेत.

फसवणुकीचे प्रकार वाढले

मागील काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. दरम्यान, याप्रकरणी यापूर्वी माजलगाव व इतर ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. मात्र, या प्रकरणांचा अद्याप तपास लागलेला नाही. या प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. जेणेकरून नागरिकांची फसवणूक होणार नाही. नागिरकांनीदेखील सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: An online bribe of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.