जागतिक दूध दिनानिमित्त ऑनलाइन मार्गदर्शन - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:32+5:302021-06-05T04:24:32+5:30

जागतिक दूध दिनाच्या निमित्ताने दूध व दुग्धजन्य पदार्थ आणि त्यांचे तंत्रज्ञान या विषयावर खामगाव कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने दुग्ध ...

Online Guide to World Milk Day - A | जागतिक दूध दिनानिमित्त ऑनलाइन मार्गदर्शन - A

जागतिक दूध दिनानिमित्त ऑनलाइन मार्गदर्शन - A

Next

जागतिक दूध दिनाच्या निमित्ताने दूध व दुग्धजन्य पदार्थ आणि त्यांचे तंत्रज्ञान या विषयावर खामगाव कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. कुलकर्णी बालत होते. यावेळी डाॅ. कुलकर्णी यांनी जागतिक दूध दिनानिमित्त दुग्धजन्य पदार्थ व त्याचे तंत्रज्ञान याविषयावर सखोल माहिती दिली. तसेच दुधाचा महापूर,जागतिक दूध दिन साजरा करण्यामागचा उद्देश काय? याविषयी माहिती दिली.

प्रा. के. एल. जगताप यांनी आपल्या खुमासदार शैलीत शेतीला जोडधंदा जोपासलाच पाहिजे तरच शेतकरी आपला उदरनिर्वाह व्यवस्थितरीत्या करू शकेल, असे स्पष्ट केले. या कार्यक्रमात ३५ शेतकरी सहभागी झाले होते. कार्यक्रमात शेतकऱ्यांनी प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले. प्रा. बरसाळे यांनी आभार मानले.

Web Title: Online Guide to World Milk Day - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.