धारूरमध्ये फेरीवाल्यांचे ऑनलाईन सर्वेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:36 AM2021-02-09T04:36:29+5:302021-02-09T04:36:29+5:30
: शहरातील फेरीवाल्यांची ऑनलाईन नोंदणी तसेच सर्वेक्षण मोहिमेला नगराध्यक्ष डाॅ. स्वरूपसिंह हजारी यांच्या उपस्थितीत झाली. ...
: शहरातील फेरीवाल्यांची ऑनलाईन नोंदणी तसेच सर्वेक्षण मोहिमेला नगराध्यक्ष डाॅ. स्वरूपसिंह हजारी यांच्या उपस्थितीत झाली. या नोंदणीनंतर फेरीवाल्यांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान फेरीवाला धोरणांतर्गत दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये या फेरीवाल्यांची मोबाईल ॲपद्वारे नोंद करण्यात येत आहे. धारूर नगरपालिकेच्या वतीने या सर्वेक्षणाचा प्रारंभ नगराध्यक्ष डाॅ. स्वरूपसिंह हजारी यांच्या उपस्थितीत झाला. डॉ. हजारी यांनी यावेळी योजनेची माहिती, तसेच उद्देश सांगितला. फेरीवाल्यांच्या कौशल्याचा विकास करणे. त्यांच्या उपजीविकेचा दर्जा उंचाविण्यावर भर देण्यात येणार असून, फेरीवाल्यांच्या भागात पायाभूत विकासावर भर देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या सर्वेक्षणात सर्व फेरीवाल्यांनी आपली नोंद करून घ्यावी, असे अवाहन डाॅ. हजारी यांनी केले.
यावेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, नगरसेवक बालाजी चव्हाण, शेख एजाज, सुरेश लोकरे, सहायक प्रकल्प अधिकारी किरण नेहरकर, आदी उपस्थित होते.