बीड जिल्ह्यात केवळ ३८ टक्केच कर वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:20 AM2018-03-29T01:20:28+5:302018-03-29T01:20:28+5:30
कर भरणा करण्यास नागरिकांची उदासिनता असून कर वसुली करण्यास नगर पालिका व नगर पंचायतींचा आखडता हात असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात केवळ ३८ टक्के कर वसुली झाली आहे. पालिकांमध्ये अंबाजोगाई आघाडीवर असून माजलगावचा सर्वात नीचांक आहे. तर नगर पंचायतीत केज पहिल्या क्रमांकावर असून पाटोद्याची केवळ ४ टक्केच वसुली आहे. ही आकडेवारी पाहता प्रशासनासाठी हा चिंतेचा विषय बनला असून कडक पाऊले उचलण्यास प्रशासन धजावत नसल्याचे बोलले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कर भरणा करण्यास नागरिकांची उदासिनता असून कर वसुली करण्यास नगर पालिका व नगर पंचायतींचा आखडता हात असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३८ टक्के कर वसुली झाली आहे. पालिकांमध्ये अंबाजोगाई आघाडीवर असून माजलगावचा सर्वात नीचांक आहे. तर नगर पंचायतीत केज पहिल्या क्रमांकावर असून पाटोद्याची केवळ ४ टक्केच वसुली आहे. ही आकडेवारी पाहता प्रशासनासाठी हा चिंतेचा विषय बनला असून कडक पाऊले उचलण्यास प्रशासन धजावत नसल्याचे बोलले जात आहे.
आर्थिक वर्ष संपत आल्याने पालिक व नगर पंचायतींच्या वतीने कर वसूलीला अधिक गती देण्यात आली आहे. मागी महिनाभरापासून कर वसुलीचा टक्का वाढला असला तरी जिल्ह्याचा एकुण वसुलीचा टक्का पाहता खुपच कमी आहे. पालिकांनी कर वसुलीसाठी विशेष पथके नियुक्त केली. शिवाय कारवायाही करण्यास सुरूवात केली. वास्वविक पाहता या कारवाया केवळ सर्वसामान्यांवर करण्यात आल्या. धनदांडग्यांना वगळण्यात आल्याने वसुलीचा टक्का वाढत नसल्याचे सूत्रांकडून समजते. कर बुडविणाऱ्यांवर धनदांडग्यांवरही सर्वसामान्यांप्रमाणेच कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सर्वांवर समान कारवाई आणि कारवाईचा धाक दाखवून वसुली केल्यास वसुलीची टक्केवारी वाढल्याशिवाय राहणार नाही, असे सांगण्यात येते.
मालमत्ता, पाणीपट्टी, रोहयो, शिक्षण कर आकारले जातात. पाणीपट्टी आणि घरपट्टीत समाधानकारक वसुली झालेली आहे. परंतु मालमत्ता कराची टक्केवारी खूपच कमी आहे. मालमत्ता कर भरण्यास नागरिकांची उदासिनता असल्याचे दिसून येत आहे. तसेच शासकीय कार्यालयांकडेही मोठ्या प्रमाणात थकबाकी असून वसुलीसाठी अद्याप तरी पालिकांनी पाऊले उचलले नसल्याचे दिसून येते.
सर्व वसुली करुन पालिकांचा कारभार सुधारावा, अशी मागणी होत आहे.
अशी आहे वसुली : वारंवार बैठका घेऊनही यंत्रणेचे दुर्लक्ष
कर वसुली करण्यात अंबाजोगाई नगर पालिका आघाडीवर आहे. अंबाजोगाईत ६९.४९ एवढी वसुली झाली असून बीड ४०, परळी ३०, गेवराई ४६, धारूर ४४, माजलगावची केवळ २४ टक्के वसुली आहे. न.पं.मध्ये केज पंचायतीने ५४ टक्के वसुली केली आहे तर आष्टी २०, शिरूरकासार १३, वडवणी ४१ टक्के एवढी वसुली आहे. पाटोद्यात मात्र केवळ चार टक्के वसुली झाल्याची नोंद जिल्हा प्रशासन विभागाकडे आहे. जिल्हा प्रशासन अधिकारी मिलींद सावंत यांनी सर्व नगर पालिका व नगर पंचायतींच्या मुख्याधिकाºयांच्या कर वसुलीसंदर्भात वारंवार बैठका घेतल्या. त्यांना सूचना केल्या. कारवाईचे आदेशही दिले. परंतु मुख्याधिकाºयांनी पहिले पाढे पंचावन्न असेच कार्य केले. त्यामुळेच वसुलीचा टक्का ३८ टक्यांवर थांबला आहे. सावंत यांच्या सूचनांकडे मुख्याधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.