बीड जिल्ह्यात ५६ दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:51 PM2018-10-11T23:51:04+5:302018-10-11T23:51:41+5:30

Only 56 days of feed left in Beed district | बीड जिल्ह्यात ५६ दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक

बीड जिल्ह्यात ५६ दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक

Next
ठळक मुद्देदुष्काळसदृष्य परिस्थिती : प्रशासनाने मागवला अहवाल

प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खरीप पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून, कापसाची पहिली वेचणी देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी होऊ शकणार नाही. पिकांची ही परिस्थिती असताना जनावरांच्या चाºयाचा प्रश्न देखील गंभीर होऊ लागला आहे. दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिल्लक असणाºया चाºयाची माहिती शासनाच्या वतीने मागवण्यात आली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात ८ लाख २२ हजार ३६४ जनावरांची संख्या आहे. यामध्ये गाय व म्हैस वर्ग यांचा समावेश आहे. खरीप हंगामामध्ये खरीपाची ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन व इतर कडधान्य या पिकांपासून चारा निर्मिती मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता होती. मात्र, पाऊस न झाल्यामुळे पिकांची वाढ पूर्ण झाली नाही. त्यामुळे खरीप हंगामामध्ये होणारी चारा निर्मिती ही अंदाजापेक्षा कमी प्रमाणात झाली आहे, खरीपांची पिके सोडून अंदाजे ५६ दिवस पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील काळात चाºयाची टंचाई भासेल असे मत शेती तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
खरीप हंगामात ६ लाख ५८ हजार २४० हेक्टर पिकांची तर ४९ हजार ६९० हेक्टरवर ऊस पिकाची लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. कृषी विभागाने दिलेल्या पीक पेरा अहवालाच्या आधारावर जिल्ह्यात किती चारा शिल्लक आहे, याची माहिती पशुसंवर्धन विभाग प्रशासनाला कळवणार आहे. या संपूर्ण माहितीचा अहवाल जिल्हाधिकाºयामार्फत मंत्रालयात पाठवला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीवरच टंचाईच्या काळात जनावरांसाठी चारा, पाणी व इतर व्यवस्था व उपाययोजना शासनस्तरावर होणार आहे. परंतु चाºयाचा अहवाल नजरी आणेवारीप्रमाणे देऊ नये प्रत्यक्ष परिस्थिती पाहून चारा किती शिल्लक आहे याची माहिती शासनाला द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.
२०१६ साली प्रशासनाच्या वतीने ठोकताळे वापरुन शिल्लक चाºयाची माहिती शासनाकडे पाठवली होती. परंतु ती माहिती योग्य नसल्यामुळे शासनाने सुरु केलेल्या चारा छावण्या बंद केल्या होत्या. त्यानंतर मात्र टंचाई परिस्थिती पाहून पुन्हा चारा छावण्या सुरू करण्याची वेळ शासनावर आली होती. अहवाल चुकीचा असल्यामुळे ही वेळ शासनावर आली होती. यावर्षी ही वेळ येऊ नये, योग्य पद्धतीने पाहणी करून शिल्लक चाºयाची माहिती शासनाला कळवावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.
जिल्हाभरात जनावरांची संख्या 822364
खरीपाचा पेरा ६ लाख ५८ हजार २४० हेक्टर
ऊस लागवड ४९ हजार ६९० हेक्टर

Web Title: Only 56 days of feed left in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.