गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत २०१ पैकी फक्त ८६ प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:31 AM2021-05-22T04:31:34+5:302021-05-22T04:31:34+5:30

बीड : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेद्वारे १० डिसेंबर २०१९ ते ९ डिसेंबर २०२० या कालावधीत शेतकरी अपघात ...

Only 86 proposals out of 201 approved in Gopinath Munde Farmers Accident Insurance Scheme | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत २०१ पैकी फक्त ८६ प्रस्ताव मंजूर

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत २०१ पैकी फक्त ८६ प्रस्ताव मंजूर

Next

बीड : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेद्वारे १० डिसेंबर २०१९ ते ९ डिसेंबर २०२० या कालावधीत शेतकरी अपघात प्रकरणाचे २०१ प्रस्ताव कंपनीकडे पाठवण्यात आले होते. मात्र, त्यापैकी फक्त ८६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर, ११५ प्रस्ताव अद्याप धूळखात कंपनीकडे पडले आहेत. विशेष म्हणजे विमा कंपनीचा कार्यकाळ संपून ५ महिने उलटले आहेत. तरी देखील प्रस्तावासंदर्भात निर्णय झालेला नाही.

शेतात काम करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, संर्पदंश, विंचूदंश, विजेच्या तिव्र धक्क्याने मृत्यू, तसेच वाहन अपघात व इतर कोणत्याही कारणांमुळे होणारे मृत्यू व येणारे कायमचे अपंगत्व त्यामुळे शेतकरी कुटुंबाला मोठा धक्का बसतो. तसेच घरातील कर्ता व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे उत्पन्नाचे साधन अचानक बंद होऊन आर्थिक परिस्थिती डबघाईला येते. या अपघातग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी भाजप शासन काळात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु करण्यात आली आहे.

योजनेच्या डिसेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत २०१ प्रस्ताव कृषी विभागाकडे आले होते. त्यानुसार कृषी विभागाने जायका इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.नागपूर व दि युनिव्हर्सल कंपनी लिमिटेड यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवले होते. मात्र, कार्यकाळ संपल्यानंतर देखील यामधील फक्त ८६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर, ११ प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत. तसेच ४४ प्रस्तावांमध्ये कंपनीला त्रुटी आढळली आहे. ६० प्रस्ताव कंपनीचा कार्यकाळ संपल्यानंतर देखील मंजुर करण्यासाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे हे प्रस्ताव कधी मंजूर होणार असा सवाल प्रस्ताव दाखल केलेल्या शेतकरी कुटुंबांकडून विचारला जात आहेत.

यांना आहे विमा संरक्षण

शेतकरी कुटुंबातील वहितीधारक शेतकरी, तसेच त्याची पत्नी किंवा मुलगा अथवा अपविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक अशा दोन जणांसाठी ही योजना वर्षभर लागू असणार आहे. या कालावधीत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, अपघातामुळे दोन अवयव निकामी झाल्यास २ लाख रुपये तर, अपघातामुळे एक डोळा निकामी झाल्यास २ लाख तसेच एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपये अनुदान देण्यात येते. यासाठी कृषी विभागामार्फत अर्ज करावा लागतो.

कार्यकाळ संपल्याने नवीन कंपनी

१०२९-२०२० करीता जायका इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.नागपूर व दि युनिव्हर्सल कंपनी लिमिटेड या विमा कंपनीला राज्याने ३.०४ कोटी शेतकरी व कुटुंबातील एक सदस्य यांच्या विम्यापोटी ९८ कोटी रुपये ५ लाख ८३४ रुपये भरले होेत. त्या तुलनेत प्रस्ताव मंजुर करण्याचे प्रमाणा मात्र, अत्याल्प आहे. तर, या कंपनीचा कार्यकाळ देखील संपला असून, ०७ एप्रिल २०२१ ते ०६ एप्रिल २०२२ या वर्षाकरीता युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरंन्स कंपनी लि. या कंपनीमार्फत तर, मे. ऑक्झिनियम.इन्शुरंन्स ब्रोकर्स प्रा.लि.नवी मुंबई या विमा सल्लागार कंपनीमार्फत संपुर्ण राज्यात राबवण्यात येत आहे. या कंपनीकडे आतापर्यंत ५३ प्रस्ताव दाखल झाले असून, अद्याप एकही मंजूर करण्यात आलेला नाही.

Web Title: Only 86 proposals out of 201 approved in Gopinath Munde Farmers Accident Insurance Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.