डबल कॅरम स्पर्धेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:31 AM2021-02-14T04:31:41+5:302021-02-14T04:31:41+5:30
बीड: शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे न्यु बीड डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र लेवल डबल कॅरम स्पर्धेचे ...
बीड: शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे न्यु बीड डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र लेवल डबल कॅरम स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, उपजिल्हाप्रमुख हनुमान पिंगळे, मोईन मास्टर, तालुकाप्रमुख गोरख सिंघन, नगरसेवक शेख मतीन, कॅरम असोसिएशनचे शेख इलियास, सचिव इफतेखर, सय्यद शाकेर, आमेर सलीम, अकबर मोमीन, शहेबाज अत्तार, हमीद मोमीन, जैतुल्ला खान, शेख बिलाल, मुजीब मनियार, नासेर खान, सलिम बागवान उपस्थित होते.
गरजूंनी कागदपत्रे जमा करावीत
बीड : येथील पटेल फाऊंडेशनच्या वतीने निराधार हक्क शिबिरांतर्गत श्रावणबाळ, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या समस्या सोडवल्या जात आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत उमाकिरण संकुल समोर, पटेल कॉम्पलेक्स, शाहूनगर येथे गरजूंनी कागदपत्रे जमा करावी, असे आवाहन तालुका सरचिटणीस आदिल रज्जाक सय्यद यांनी केले.
रस्ता सुरक्षा अभियानातून जनजागृती
बीड : शहरामध्ये सध्या वाहतूक पोलीस विभागाकडून रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत जनजागृती करणारे स्टिकर्स रिक्षावर चिटकवण्यात आले. यावेळी पो. ना. संजय सोनवणे, पो. कॉ. महेश खाडे, पो. ना. पद्मनाभन टाकणखार, पो. हे. बाबुराव जमशेटे एएसआय वालवडकर, गणेश मैड आदी उपस्थित होते.
वीज कनेक्शन तात्काळ जोडा
बीड : शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी वीजपुरवठा बंद करून पीक पाण्याअभावी जाळण्याचा घाट आघाडी सरकार व महावितरणने घातला आहे. थोडे -फार पाणी आहे. या पाण्यावर शेतकऱ्याला पीक घेऊ द्यावे. त्यामुळे तात्काळ वीज कनेक्शन जोडून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा शिवसंग्राम तीव्र आंदोलन करेल असा इशारा राजेंद्र आमटे, प्रशांत डोरले, बाबू सुरवसे, सौरभ तांबे, हरीश शिंदे यांनी दिला आहे.
उघड्या रोहित्रांमुळे धोका वाढू लागला
शिरूर कासार : शहर आणि परिसरात असलेल्या अनेक रोहित्रांना दरवाजेच नाहीत. जेथे आहेत ती नेहमी उघडीच असतात. दरवाजे लावण्याकडे महावितरणचे कर्मचारी देखील डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांना सूचना देण्याची मागणी होत आहे.
पाणपाेई कोरडी
बीड : शहरातील बसस्थानकात प्रवाशांसाठी बांधलेली पाणपोई कोरडीठाक पडली आहे. तसेच त्याची दुरवस्थाही होत आहे. यामुळे प्रवाशांना खाजगी हॉटेलचा आधार घेण्याची वेळ आली आहे. यामुळे त्यांना नाहक भुर्दंड बसत आहे. याकडे आगारप्रमुखांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
संत सेवालाल जयंतीचे आयोजन
गेवराई : बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा सेवालालनगर येथे १५ फेब्रुवारी रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव प्रा.पी.टी.चव्हाण, गोरसेना प्रदेश उपाध्यक्ष अनिल राठोड , डाॅ. जीवन राठोड आदींनी केले आहे.