गेवराईत अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या १५ रिक्षांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 04:57 PM2018-07-02T16:57:19+5:302018-07-02T17:03:13+5:30
गेवराई ठाण्याअंतर्गत होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूकीवर पोलिसांनी आज सकाळी कारवाई केली.
गेवराई (बीड ) : गेवराई ठाण्याअंतर्गत होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूकीवर पोलिसांनी आज सकाळी कारवाई केली. यात तब्बल १५ अॅपे रिक्षांवर कारवाई करत ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
तालुक्यात मोठ्याप्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक होत आहे. यामुळे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी यावर कारवाई करण्यात आली. यावेळी बीड, पाडळसिंगी, तलवाडा जातेगांव यासह इतर मार्गांवरील १५ अॅपे रिक्षांवर हि कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
या कारवाईत पो.ना. विकास साळुंके , पो. व्ही.ए. प्रधान , पो.ह.बी. एन जाधव ,नारायण खटाने, शरद बहिरवाळसह अनेकजण सहभागी होते. या कारवाई मुळे अवैध वाहतुक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.