माकपचा तालखेड येथे मोर्चा, नित्रूडला निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:32 AM2018-11-02T00:32:31+5:302018-11-02T00:36:50+5:30

तालुक्यातील तालखेड व नित्रूड येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने २ रु. किलोने रेशन द्यावे, संजय गांधीच्या लाभार्थींना अनुदान तात्काळ द्यावे, यासाठी गुरुवारी तलाठी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला तर नित्रूड येथील तलाठी कार्यालयावर शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, रोजगार हमी योजनेच्या कामे द्यावीत यासाठी निदर्शने करण्यात आली.

Opposition at Morphe talkhed, Morat, Nitrudal | माकपचा तालखेड येथे मोर्चा, नित्रूडला निदर्शने

माकपचा तालखेड येथे मोर्चा, नित्रूडला निदर्शने

Next
ठळक मुद्देदुष्काळाच्या मागणीसह इतर मागण्या : दुष्काळात हेक्टरी ५० हजार रु पये नुकसान भरपाईसह रोहयो कामाची केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यातील तालखेड व नित्रूड येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने २ रु. किलोने रेशन द्यावे, संजय गांधीच्या लाभार्थींना अनुदान तात्काळ द्यावे, यासाठी गुरुवारी तलाठी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला तर नित्रूड येथील तलाठी कार्यालयावर शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, रोजगार हमी योजनेच्या कामे द्यावीत यासाठी निदर्शने करण्यात आली.
तालखेड येथील मोर्चेकºयांनी जनावरांच्या दावणीला चारा व पाण्याची व्यवस्था करा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा फीस माफ करा, तालखेड शिवारात रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ चालू करा, बोंडअळीचे अनुदान वाटप करा आदी मागण्या मांडल्या. यावेळी मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकाºयांना देण्यात आले. यावेळी माकप तालखेड शाखा सचिव कॉ.अशोक राठोड, सदस्य कॉ.विनायक चव्हाण कॉ.भीमराव जाधव, कॉ.विजय राठोड, ग्रा.पं.सदस्य बिबाबाई जाधव, दयानंद जाधव, कॉ.संजय चव्हाण, माजी ग्रा.पं.सदस्य माणिक जाधव, अविनाश डुबे, भास्कर खांडे, रेवन यादव, छबू राठोड, विनायक राठोड, राजाभाऊ जाधव, बापूराव घेणे, महादेव सुरवसे, भीमराव राठोड, गिन्यानदेव राठोड, शिवाजी मुठाळ, लखन राठोड, शिवाजी जाधव, दत्ता शेळके, मोहन राठोड यांच्यासह शेतकरी, महिला सहभागी झाल्या होत्या.
तालुक्यातील नित्रूडच्या आंदोलनात यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. शेतकºयांनी लागवड केलेली पिके उगवलेच नाही. जे उगवले आहे ते पूर्ण करपून गेले. शेतकºयांचा पेरणी करण्यासाठी केलेला खर्च देखील निघालेला नाही. शिवारातील कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, यासह सर्व पिके पावसाअभावी करपून गेले आहेत. गुरांचा चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतात पिक नसल्याने मजुरांच्या हाताला काम शिल्लक राहिले नाही.
त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ सुरू करा, शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, शेतकºयांच्या जनावराना दावणीला चारा देण्यात यावा, गरीब व अल्पभूधारक शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ करा, शेतकºयांना नव्याने कर्ज पुरवठा करा, २०१६-१७ च्या अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ वाटप करा, उपळी धरणाचे पाणी नित्रूडच्या तलावात सोडण्यात यावे, कृषी पंपाचे वीज बिल माफ करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन तलाठी मढकर यांना देण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व कॉ दत्ता डाके यांनी केले. आंदोलनात संदीपान तेलगड, सुभाष डाके, माणिक काळे, सय्यद रज्जाक, जनक तेलगड, पोपट गायकवाड, नारायण तातोडे, सुखदेव घुले, दत्ता घुले, शेख खलील, अर्जुन तातोडे, लक्ष्मण आव्हाड, अप्पा आढाव, रामभाऊ पवार, पांडुरंग उबाळे, लिंबाजी पवार, हनुमंत कोथिंबीरे यांच्यासह शेतकरी, शेतमजूर सहभागी होते.

Web Title: Opposition at Morphe talkhed, Morat, Nitrudal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.