प्रशासनाच्या आदेशाला भाजी विक्रेत्यांचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:58 AM2021-03-13T04:58:35+5:302021-03-13T04:58:35+5:30

बुधवारी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आल्याचे ध्वनिक्षेपकाद्वारे दोन दिवस आधीपासून सूचना देण्यात आली होती. तसेच आठवडी बाजाराच्या ...

The order of the administration was rejected by the vegetable sellers | प्रशासनाच्या आदेशाला भाजी विक्रेत्यांचा खो

प्रशासनाच्या आदेशाला भाजी विक्रेत्यांचा खो

Next

बुधवारी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आल्याचे ध्वनिक्षेपकाद्वारे दोन दिवस आधीपासून सूचना देण्यात आली होती. तसेच आठवडी बाजाराच्या ठिकाणी नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी तळ ठोकून होते. त्यामुळे शहरातील आठवडी बाजाराच्या ठिकाणी भाजी विक्रेते न बसता त्यांनी नाईक नगर,ताकडगाव रोड, सावता नगर,कोल्हेर रोडवर अशा विविध ठिकाणी बाजार मांडला. खरेदी करण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली होती. या भाजी विक्रेत्यांना नगर परिषद कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणाहून हुसकावुन लावले. मात्र पुन्हा पुन्हा भाजी विक्रेते बसू लागल्याने गर्दी झाली होती. या संदर्भात मुख्याधिकारी उमेश ढाकणे म्हणाले, बाजार रद्द करण्यात आल्याचे दोन दिवस आधी व बाजाराच्या दिवशी सर्वांना सूचित केले होते. तरी देखील काही ठिकाणी भाजी विक्रेते बसले होते.त्यांना नगर परिषद कर्मचाऱ्यांनी नियम सांगून हुसकावून लावले.

===Photopath===

110321\11bed_4_11032021_14.jpg

===Caption===

गेवराईत भाजी विक्रेते गल्ली बोळात विक्री करत होते. 

Web Title: The order of the administration was rejected by the vegetable sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.