बीड जिल्ह्यात पानटपऱ्या बंदचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:50 PM2020-03-19T23:50:25+5:302020-03-19T23:51:06+5:30
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी तंबाखू व तंबाखूजन्य धुम्रपानाचे पदार्थांची विक्री करणारी सर्व दुकाने, पान टप-या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी १९ मार्च रोजी दुपारी जारी केले आहेत.
बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी तंबाखू व तंबाखूजन्य धुम्रपानाचे पदार्थांची विक्री करणारी सर्व दुकाने, पान टप-या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी १९ मार्च रोजी दुपारी जारी केले आहेत.
महाराष्टÑ शासनाने ‘महाराष्टÑ कोव्हीड १९ उपाययोजना नियम २०२०’ जारी केले आहेत. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करुन सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धुम्रपापन करण्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार, प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी जिल्हाधिकाºयांनी हा आदेश जारी केला आहे. या संदर्भात जिल्ह्यातील सर्व नगर पालिका व नगर पंचायतचे मुख्याधिकारी तसेच ग्रामसेवकांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असून दररोजचा अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे. यासाठी जि. प. चे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस उपअधीक्षक (गृह) तसेच अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणा-या व्यक्ती अथवा संस्थांवर दंडनीय व कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
पोलीस - पालिकेचे भोंगे फिरले
गुरुवारी दुपारी जिल्हाधिकाºयांनी आदेश जारी केल्यानंतर तात्काळ अंमलबजावणी सुरु झाली. जिल्हाभरात स्थानिक यंत्रणा तसेच पोलिसांकडून ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करुन पानटपºया बंद केल्या. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळच्या वेळी पानटपºयांवर तसेच तंबाखू पदार्थाच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी झाली होती. या निर्णयाचे जनतेतून स्वागत होत आहे.
जिल्हाभरात १४ चेकपोस्ट
बीड : जिल्ह्यात येणाºया प्रवाशांची मााहिती घेण्यासाठी जिल्ह्यातील ११ तालुक्यातील मार्गावर १४ चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत.
शहागड पूल, पांढरवाडी फाटा, अंभोरा फाटा, चौसाळा, माळेगाव, बर्दापूर फाटा, गंगाखेड रोड, सोनपेठ फाटा, गंगामसला, सादोळा, बोरगाव पिंपरी, मातोरी, पाथर्डी, महार टाकळी, शेवगाव, मानूर, चिंचपूर फाटा या ठिकाणी हे चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. या चेकपोस्टवर बीड जिल्ह्यात येणा-या प्रवाशांची नोंद ठेवली जाणार आहे. यासाठी पथके निर्माण केली आहेत.