आचारसंहितेचा भंग केल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:50 AM2019-09-25T00:50:37+5:302019-09-25T00:53:05+5:30

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मंगळवारी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला.

Order for filing a crime if the code of conduct is violated | आचारसंहितेचा भंग केल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश

आचारसंहितेचा भंग केल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मंगळवारी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या संदर्भात विविध सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या, तसेच आचारसंहितेचे पालन न करणाऱ्यांची गय न करता थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी सोयी-सुविधा पुरविण्याबाबत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच नियंत्रण कक्षाला देखील भेट देऊन पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर, शोभा जाधव, प्रकाश आघाव पाटील, नामदेव टिळेकर, नम्रता चाटे, गणेश महाडिक हे विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हा कोषागार अधिकारी दिलीप झिरपे, जिल्हा सूचना अधिकारी प्रवीण चोपडे, श्रीकांत गायकवाड आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले, राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांना निवडणूक संबंधित सर्व माहिती द्यावी. दिव्यांग मतदारांची मतदान केंद्रापर्यंत ने - आण करण्यासाठी पुरेशी वाहने उपलब्ध ठेवावीत. व्हील चेअर्स, रँप आदि आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथकांनी अधिक परिणामकारकपणे काम करावे, असे सांगून सुनील केंद्रेकर म्हणाले, स्वीप उपक्रमाच्या सहाय्याने मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यासाठी कृती आराखडा तयार करावा. यावेळी त्यांनी निवडणूक कामकाजासाठी कर्तव्यावर असणारे अधिकारी - कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचेही निर्देश दिले.
तसेच, जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा, ईपिक कार्ड वाटप, संवेदनशील मतदान केंद्रे, अद्ययावत मतदार यादी, पुरेसे मनुष्यबळ, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, स्ट्राँग रूम, मतदान केंद्र तपासणी, वाहतूक आराखडा, दजेर्दार प्रशिक्षण, साहित्य सामग्री व्यवस्थापन, सीव्हीजिलसह अन्य, आचारसंहिता कक्ष, उत्पादन शुल्क विभागाकडून होणारे मॉनिटरिंग, माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती आदी बाबींचा आढावा घेऊन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक कारवाई इ. बाबत पुरेशी दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आणि जिल्हा पोलीस, अधीक्षक हर्ष पोद्दार तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिका-यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील तयारीच्या अनुषंगाने बैठकीच्या वेळी आयुक्तांना माहिती दिली. दरम्यान, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नियंत्रण कक्षाची पाहणी केली.
सोशल मीडियावर असणार लक्ष
निवडणूक कालावधीमध्ये आचारसंहिता भंग होत असेल तिथे कठोर कारवाई करावी. संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना यावेळी केंद्रेकर यांनी केल्या. तसेच, कोणत्याही निवडणुकीच्या उमेदवारांना आॅडिओ व्हिज्युअल माध्यमातून तसेच सोशल मीडियावर जाहिरात करण्यापूर्वी प्रमाणित करून घेणे परवानगी घेणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Order for filing a crime if the code of conduct is violated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.