कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:32 AM2021-04-10T04:32:36+5:302021-04-10T04:32:36+5:30

बीड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असेन. राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागाने नागरिकाच्या सुरक्षिततेच्या ...

In order to prevent the spread of Corona virus | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने

Next

बीड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असेन. राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागाने नागरिकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दस्त नोंदणीसाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध केली आहे. या सेवाचा नागरिकांनी वापर करून दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करण्याचे आवाहन सह जिल्हा उपनिबंधक वर्ग १ बीड यांनी केले आहे.

नागरिकांनी या विभागाच्या संकेतस्थळावर असलेल्या दस्त नोंदणीकरिता पीडीईद्वारे डाटा एंट्री करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापुढे दुय्यम निबंधक कार्यालयात डेटा एंट्री किंवा दुरुस्त्या पूर्णपणे थांबविण्यात आल्या आहेत. नागरिकांनी पीडीई PDE डेटा एंट्री करून दस्त नोंदणीसाठी या विभागाच्या वेबसाईटवर estep-in या प्रणालीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेली सोईची वेळ ऑनलाईन आगाऊ बुक करून किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर समक्ष संपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत आगाऊ वेळ आरक्षित केली नसल्यास (waiking) दस्त नोंदणी होणार, असे सांगण्यात आले आहे.

नागरिकांनी दस्ताचे निष्पादन घरी किंवा कार्यालयाच्या बाहेरच करावे व प्रत्येक व्यक्तीने सह्यांसाठी स्वत:चे पेन आणणे, एकच पेन एकमेकांत स्वाक्षरीसाठी वापरू नये. आरक्षित वेळेलाच कार्यालयात हजर राहावे, मास्क लावल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. विभागाच्या वेबसाईटवर ॲड लायसन ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह ॲड लायसन दस्ताची कार्यालयातील नोंदणी (फिजिकल रजिस्ट्रेशन) पुढील आदेशापर्यंत थांबवविण्यात आले आहे.

सद्यस्थितीत दस्त नोंदणीसाठी मोठ्या शहरात (उदा. मुंबई, ठाणे, पुणे व इतर ठिकाणी) सकाळ, दुपार दोन सत्रात कार्यालये सुरू राहतील. त्या ऐवजी अशा सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची वेळ नियमित सत्रात म्हणजेच सकाळी ९.४५ ते ६.१५ या वेळेत सुरू राहतील. याशिवाय जी दुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणीसाठी शनिवार व रविवार सुटीच्या दिवशी सुरू होते, त्याचे कामकाज शनिवार, रविवार बंद करण्यात आले असून त्या कार्यालयाचे कामकाज सोमवार ते शुक्रवार पाच दिवस नियमित सुरू राहील. ऑनलाईन सुविधांचा वापर करण्याचे अनिवार्य केले असून नागरिकांनी दस्त नोंदणीस शासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: In order to prevent the spread of Corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.