सरकारी योजनेसह कायद्याच्या माहितीसाठी शिबिरांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:39 AM2021-09-24T04:39:16+5:302021-09-24T04:39:16+5:30

आष्टी येथील तहसील कार्यालयात आयोजित कायदेविषयक शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. न्या. माने म्हणाले, केंद्र शासनाच्या आणि ...

Organizing camps for legal information along with government schemes | सरकारी योजनेसह कायद्याच्या माहितीसाठी शिबिरांचे आयोजन

सरकारी योजनेसह कायद्याच्या माहितीसाठी शिबिरांचे आयोजन

googlenewsNext

आष्टी येथील तहसील कार्यालयात आयोजित कायदेविषयक शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. न्या. माने म्हणाले, केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या शेतकरी सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला बालके, मानसिकदृष्ट्या विकलांग यांच्यासाठी आर्थिक मदतीच्या अनेक योजना आहेत. त्यासाठी कायद्याच्या तरतुदी आहेत. यासंबंधीची माहिती शिबिरातून देण्यात येते. जमिनीचा वाद, बँकेसंबंधीची प्रकरणे लोक अदालतीमध्ये मिटवल्यामुळे पैसा आणि वेळेचा अपव्यय टळतो. बँकांकडून व्याजावर सूट देण्यात येत असल्यामुळे लोकअदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात यावीत, असे आवाहन एन. के. शिंपी यांनी यावेळी केले. व्यासपीठावर नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे, नीलिमा थेऊरकर, शारदा दळवी, महादेव पंढरपुरे, वकील संघाचे अध्यक्ष महादेव तांदळे, आदी उपस्थित होते. ॲड. महादेव मोहिते, ॲड. बाबूराव गर्जे यांनी विविध योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक ॲड. अजय जोशी यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. संग्राम गळगटे यांनी केले. नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे यांनी आभार मानले.

230921\23bed_6_23092021_14.jpg

Web Title: Organizing camps for legal information along with government schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.