सामुदायिक विवाहाचे आयोजन पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:51 AM2021-02-23T04:51:19+5:302021-02-23T04:51:19+5:30

माजलगाव : शहरातील बँक कॉलनी भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवून सामूहिक विवाह सोहळा केल्याप्रकरणी आयोजक बाळू ताकट यांच्यासह २५ ...

Organizing community weddings is expensive | सामुदायिक विवाहाचे आयोजन पडले महागात

सामुदायिक विवाहाचे आयोजन पडले महागात

Next

माजलगाव : शहरातील बँक कॉलनी भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवून सामूहिक विवाह सोहळा केल्याप्रकरणी आयोजक बाळू ताकट यांच्यासह २५ जणांविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

येथील सामाजिक कार्यकर्ते बाळू ताकट हे मागील अकरा वर्षांपासून शिवजयंतीनिमित्त सामूहिक विवाहाचे आयोजन करत आहेत. २१ रोजी या लग्नसमारंभास विनापरवाना मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. याप्रकरणी रात्री उशिरा पोलीस शिपाई अमृत मोहन पाटोळे यांनी फिर्याद दिली. लग्न आयोजकांनी व त्यांच्या साथीदारांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी आयोजक बाळू ताकट राहुल मुगदिया, ऋषिकेश शेंडगे, प्रशांत होके, सूरज पवार, संजय दिग्रस्कर, अमर राजमाने, अतुल होके, प्रदीप जाधव, सचिन सुरवसे यांच्यासह अज्ञात १०-१५ जणांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजीराजेंची उपस्थिती

दरवर्षीप्रमाणे बाळू ताकट यांनी यावर्षी शिवजयंतीनिमित्त ३१ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजनाचा निर्णय घेतला होता. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता त्यांनी केवळ ११ लग्नच मंडपात लावले, तर उर्वरित २० लग्न हे संबंधितांच्या घरी लावण्यात आले. या विवाह सोहळ्यास खा. संभाजीराजे भोसलेही उपस्थित होते.

===Photopath===

220221\img_20210221_205703_14.jpg~220221\img_20210221_205540_14.jpg

Web Title: Organizing community weddings is expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.