अंबाजोगाई ते शेगाव पहिल्या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:31 AM2021-02-14T04:31:24+5:302021-02-14T04:31:24+5:30
अंबाजोगाई :गजानन महाराज यांच्या प्रगटदिनाचे औचित्य साधून अंबाजोगाई ते श्री क्षेत्र शेगाव पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन संतोष केंद्रे,दिलीप आरसुळ ...
अंबाजोगाई :गजानन महाराज यांच्या प्रगटदिनाचे औचित्य साधून अंबाजोगाई ते श्री क्षेत्र शेगाव पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन संतोष केंद्रे,दिलीप आरसुळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. पायी दिंडी सोहळा श्री गजानन महाराज मंदिर अंबाजोगाई येथून २१ फेब्रूवारी रविवार रोजी सकाळी ७ वाजता शेगावकडे मार्गस्थ होणार आहे.
योगेश्वरी देवी मंदिर,आज्ञकवी मुकूंदराज स्वामी महाराज,दासोपंताची समाधी अशी अनेक देवदेवतांचे मंदिर व सांधुसंथाची धार्मिक नगरी म्हणून अंबाजोगाईची ओळख राज्याला आहे. मराठवाड्यातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने विदर्भ,खानदेश व निम्मा मराठवाडा, आंध्र प्रदेशातून पंढरपूर,शिर्डी, मन्मथ स्वामी, परळी वैजेनाथ, औंढा नागनाथ, चाकरवाडीला जाणाऱ्या शेकडो पायी पालख्या अंबाजोगाई मार्गे जात असतात. अंबाजोगाई शहर व तालुक्यातून आळंदी,पंढरपूर, चाकरवाडी,शिर्डीला पायी पालख्या जात असतात. अंबाजोगाई तालुक्यातून श्री क्षेत्र शेगावला पहिली मानाची पायी दिंडी सोहळ्याचे अयोजन सामाजिक कार्यकर्ते संतोष केंद्रे व दिलीप आरसुळ यांनी केले आहे. ५ मार्च रोजी होणाऱ्या गजानन महाराज प्रगट दिनाचे औचित्य साधून हा पायी सोहळा २१ फेब्रुवारी ते ४ मार्च पर्यंत १२ दिवसाचा असेल. पायी दिंडीचा मार्ग परळी,गंगाखेड, परभणी,जवळा बाजार,हिंगोली, कन्हेरगाव नाका,वाशिम, मालेगाव जंहागीर,पतुर, बाळापुर असा असून ४ मार्च रोजी शेगाव मुक्कामी राहणार आहे. हा पायी सोहळा भाविकांसाठी नि:शुल्क असून ज्या भाविकांना पायी सोहळ्यात सहभागी व्हायाचे असेल त्यांनी संतोष केंद्रे व दिलीप आरसुळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.