कांदा लागवड व विक्री व्यवस्थापन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:33 AM2021-01-20T04:33:10+5:302021-01-20T04:33:10+5:30
आष्टी तालुक्यातील कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व आ. सुरेश धस यांच्या संकल्पनेतून कांदा उत्पादक ...
आष्टी तालुक्यातील कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व आ. सुरेश धस यांच्या संकल्पनेतून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन मिळविण्यासाठी पिकाची घ्यावयाची काळजी व उत्पादन वाढवण्यासाठी करावी लागणारी फवारणी, खते या विषयी मार्गदर्शन शिबिर बुधवारी, २० जानेवारी रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कडा येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आ. सुरेश धस, तर बाबासाहेब पिसारे (कृषिभूषण) व कांदातज्ज्ञ शेतकरी, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती कडा संचालक मंडळ यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सभापती दत्तात्रय जेवे, सचिव हनुमंत गळगटे यांनी केले आहे.