‘वाचन प्रेरणा दिनाचे’ आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:30 AM2021-01-22T04:30:48+5:302021-01-22T04:30:48+5:30
बीड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्यावतीने २३ जानेवारी रोजी येथे ‘वाचन प्रेरणा दिवस’ चे आयोजन ...
बीड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्यावतीने २३ जानेवारी रोजी येथे ‘वाचन प्रेरणा दिवस’ चे आयोजन केले आहे.जिल्ह्यातील सर्व ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचारी, साहित्यीक, पुस्तकप्रेमी, वाचकप्रेमी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र ग्रंथालय सेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल जाधव यांनी केले आहे.
लोंबकळणाऱ्या तारांमुळे अपघातास निमंत्रण
बीड : शहरातील पांगरी रोड, सहयोगनगर, स्वराज्यनगर, बार्शीनाका, नगरनाका, एमआयडीसी परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या तारा लोंबकळल्या आहेत. अनेकांच्या घरावरून, तर काहींच्या घरासमोरून या तारा गेल्या असून, यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. अनेक भागांतील तारा जीर्ण झाल्या असून, महावितरणने या तारा बदलण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
वाहनधारक त्रस्त
गढी : शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्डयांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, हे खड्डे लवकरात लवकर बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गेवराईत बेशिस्त पार्किंगचा त्रास
गेवराई : शहरातील राष्ट्रीय महामार्गावर विविध शासकीय कार्यालये आहेत. येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावरच बेशिस्तपणे उभी केली जात असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. वाहनांची कोंडी होत आहे. अनेक वेळा छोटे मोठे वादही उद्भवत आहेत. वाहने पार्किंगसाठी नगर परिषद व पोलीस विभागाने उपाययोजना करूनही नागरिक बेशिस्तपणे वागताना दिसून येत आहे. अशांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
विजेचा लपंडाव सुरूच
नेकनूर : तालुक्यातील नेकनूर परिसरात सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज गायब राहत असल्याने ग्राहकांमध्ये संताप झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. महावितरण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून, सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी आहे.