महाशिवरात्रीनिमित्त वैद्यनाथाची अलंकारिक पूजा; फुलांची सजावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:59 AM2021-03-13T04:59:35+5:302021-03-13T04:59:35+5:30

यावेळी श्री वैद्यनाथास अलंकारांनी व फुलांनी सजविण्यात आले होते, अशी माहिती श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी राजेश देशमुख यांनी ...

Ornamental worship of Vaidyanatha on the occasion of Mahashivaratri; Floral decoration | महाशिवरात्रीनिमित्त वैद्यनाथाची अलंकारिक पूजा; फुलांची सजावट

महाशिवरात्रीनिमित्त वैद्यनाथाची अलंकारिक पूजा; फुलांची सजावट

Next

यावेळी श्री वैद्यनाथास अलंकारांनी व फुलांनी सजविण्यात आले होते, अशी माहिती श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी राजेश देशमुख यांनी दिली. परळीत महाशिवरात्रीनिमित्त भरण्यात येणारा यात्राेत्सव यंदा रद्द केल्याने लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली. महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात व अन्य राज्यांतून येणारे भाविक गुरुवारी आले नाहीत. यंदा कोरोना पार्श्वभूमीवर वैद्यनाथ मंदिर बंद ठेवण्यात आल्याने व यात्राेत्सव रद्द केल्याने परराज्यातील भाविक येथे दर्शनास आले नाही. त्यामुळे येथील बेल-फूल विक्रते, पेढे विक्रते, रिक्षा, खेळणीचे साहित्य व मंदिर परिसरातील हॉटेल यांच्या व्यवसायावर परिणाम जाणवला.

यात्राेत्सव नसल्याने विविध प्रकारचे स्टॉल, रहाटपाळणे, मीना बाजार, कुस्त्यांचे फड, अश्व स्पर्धा, कृषी प्रदर्शन भरवण्यात न आल्याने अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. बाहेरचे भाविक न आल्याने परळीच्या बाजारपेठेतील कापड व्यवसायावरही परिणाम जाणवला, असे कापड व्यापारी गोपीनाथ शंकुरवार यांनी सांगितले.

यात्राेत्सव न भरल्याने कटलरी व्यवसाय यात्रेत भरवता आला नाही, त्यामुळे आर्थिक नुकसान झाले. बाजारातही गुरुवारी व्यवसाय झाला नाही.

- सतीश बेलुरे, कटलरी व्यावसायिक, परळी

===Photopath===

110321\img-20210311-wa0285_14.jpg

===Caption===

महाशिवरात्रीनिमित्त परळीत वैद्यनाथाची अलंकारीत पूजा करण्यात आली.  फुलांची सजावट करण्यात आली होती.

Web Title: Ornamental worship of Vaidyanatha on the occasion of Mahashivaratri; Floral decoration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.