...अन्यथा परिचारिका करणार कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:33 AM2021-04-18T04:33:44+5:302021-04-18T04:33:44+5:30

बीड : रुग्णसेवा करणे हेच आमचे कर्तव्य आहे. माहिती संकलित करणे, कैदी, नातेवाइकांना बाहेर हाकलणे. त्यांची सुरक्षा करणे ही ...

... otherwise the nurses will go on strike | ...अन्यथा परिचारिका करणार कामबंद आंदोलन

...अन्यथा परिचारिका करणार कामबंद आंदोलन

googlenewsNext

बीड : रुग्णसेवा करणे हेच आमचे कर्तव्य आहे. माहिती संकलित करणे, कैदी, नातेवाइकांना बाहेर हाकलणे. त्यांची सुरक्षा करणे ही कामे आमच्याकडे देऊ नका. अतिरिक्त चार्ज काढून घ्या. आम्हाला रुग्णसेवा करू द्या, असे म्हणत विविध मागण्यांचे निवेदन परिचारिकांनी आमदार संदीप क्षीरसागर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांना दिले आहे. दोन दिवसांत यावर तोडगा काढावा अन्यथा कामबंद आंदोलनाचा इशारा परिचारिकांनी दिला आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच जिल्हा रुग्णालय रुग्णांनी भरले असून खाटाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. येथे दाखल असलेल्या रुग्णांची शुश्रूषा करण्याची सर्वात माेठी जबाबदारी परिचारिकांची आहे; परंतु मागील काही दिवसांपासन वॉर्डच्या इन्चार्ज आणि अधिकारी यांच्यात धुसफूस सुरू आहे. परिसेविकांना अतिरिक्त कामकाज लावले जात आहे. तसेच त्यांच्यावर सुरक्षा रक्षकाची जबाबदारी सोपविली जात आहे. यामुळे रुग्णसेवा सोडून इतरच कामे त्यांना करावी लागत आहेत. या सर्व त्रासाला त्या वैतागल्या आहेत. यापूर्वी अनेकदा बोलूनही यावर काहीच मार्ग न निघाल्याने या सर्व परिसेविका शनिवारी आक्रमक झाल्या होत्या. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते व आमदार संदीप क्षीरसागर यांना देऊन त्यांनी आपला संताप व्यक्त केला. दोन दिवसांत मागण्या मान्य न केल्यास कल्पना न देताच कामबंद आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी लेखी स्वरूपात दिला आहे. निवेदनावर २३ इन्चार्जच्या स्वाक्षऱ्या आहेत.

यावेळी आ. क्षीरसागर, सीएस डॉ. गित्ते यांच्यासह अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, मेट्रन संगीता दिंडकर, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, डॉ. पारस मंडलेचा, डॉ. सचिन आंधळकर आदींची उपस्थिती होती.

चौकट,

मुकादमांचे कक्ष सेवकांवर नियंत्रणच नाही

जिल्हा रुग्णालयातील मुकादमांच्या कामकाजावर परिचारिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कोरोना वॉर्डमधील कक्ष सेवकांची कोणतीच जबाबदारी हे मुकादम स्वीकारत नाहीत. या वॉर्डबॉयच्या ड्युटी लावणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुकादमांना सूचना कराव्यात व कक्ष सेवक गैरहजर राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी मुकादमाची राहील, असेही निवेदनात म्हटले आहे. आठवड्यापूर्वीच एका वॉर्डबॉयने कर्तव्यावर असताना मध्यरात्री नर्सची छेड काढली होती. त्याला एका मुकादमानेच तेथे ड्युटी नसतानाही पाठविल्याचा उल्लेख तक्रारीत होता. या मुकादमाला दारू पाजून हा कक्ष सेवक वॉर्डमध्ये गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अद्यापही या मुकादमावर आणि वॉर्डबॉयवर कारवाई झालेली नाही.

===Photopath===

170421\17_2_bed_12_17042021_14.jpeg~170421\17_2_bed_11_17042021_14.jpeg

===Caption===

परिसेविकांची कैफियत ऐकून घेताना आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते. सोबत डॉ.सुखदेव राठोड, मेट्रन संगिता दिंडकर आदी.~जिल्हा रूग्णालयातील आक्रमक झालेल्या परिसेविका.

Web Title: ... otherwise the nurses will go on strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.