५१४ पैकी ४९५ अहवाल निगेटिव्ह, १९ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:33 AM2021-01-20T04:33:43+5:302021-01-20T04:33:43+5:30
आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या १७ हजार ३८८ इतकी झाली आहे. मंगळवारी ५१४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४९५ जणांचे अहवाल ...
आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या १७ हजार ३८८ इतकी झाली आहे. मंगळवारी ५१४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४९५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात बीड तालुक्यातील नऊ जणांचा समावेश आहे, तर अंबाजोगाई तालुक्यात पाच व आष्टी, धारूर, माजलगाव, शिरूर, वडवणी तालुक्यांत प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. सध्या कोविड केअर सेंटर व कोविड उपचारासाठी परवानगी दिलेल्या रुग्णालयात २४८ जणांवर उपचार सुरू आहेत.
१) जिल्ह्यात १ लाख ९० हजार ४२ संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ लाख ७२ हजार ६५४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आढळला, तर आतापर्यंत १७ हजार ३८८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
२) मंगळवारी ३० रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १६ हजार ५७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ५५० जणांचा मृत्यू झाला असून, मृत्युदर ३.१६ टक्के इतका आहे.
कोरोनामुक्तीकडे की टेस्ट कमी
जिल्ह्यात मंगळवारच्या अहवालानुसार सात तालुक्यात कोरोना रुग्ण आढळले, तर रिकव्हरी रेट ९५.३४ टक्के आहे. रुग्ण बाधित आढळल्यानंतर संपर्कातील लोक तपासणीसाठी टाळाटाळ करतात, त्यामुळे टेस्टचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल म्हणता येणार नसून नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करून आरोग्याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.