सोयाबीनवर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव - A - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:38 AM2021-08-14T04:38:50+5:302021-08-14T04:38:50+5:30
कृषी सल्ला : शेतकऱ्यांनी वेळीच फवारणी करा शिरुर कासार : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पेरा झालेला असून, पीकही जोमदार ...
कृषी सल्ला : शेतकऱ्यांनी वेळीच फवारणी करा
शिरुर कासार : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पेरा झालेला असून, पीकही जोमदार दिसत आहे. असे असले, तरी सध्या या पिकावर पिवळ्या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने फवारणी करावी, असे आवाहन तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने केले आहे. शुक्रवारी कृषी सहायक दत्तगणेश माळी यांनी सोयाबीन प्लाॅटची पाहणी केली असता, हा प्रादुर्भाव दिसून आला. या रोगामुळे पाने चुरगळली जात असून, पुढे ते पिवळे पडतात. पिकांची वाढ खुंटली जाऊन लागलेल्या फुलांची झड होऊन फलधारणेवर परिणाम होतो. पर्यायाने शेंग लहान व त्यातील सोयाबीन दाण्यांची संख्या कमी होण्याची दाट शक्यता असते. वेळीच औषधी फवारणी केल्यास, यावर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषितज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधी फवारणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमृत गांगुर्डे, कृषी सहायक दत्तगणेश माळी, दिलीप तिडके, कविता ढाकणे यांनी केले आहे.
130821\13bed_1_13082021_14.jpeg
मोझॅकचा प्रादुर्भाव