जुनी पेन्शनवरून आक्रोश; शिक्षक संघाने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By शिरीष शिंदे | Published: October 2, 2023 06:15 PM2023-10-02T18:15:52+5:302023-10-02T18:16:18+5:30

बीड शहरातील छत्रपती संभाजी राजे क्रीडांगणावरून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला.

Outcry over old pensions; The teachers' union took out a march to the collector's office | जुनी पेन्शनवरून आक्रोश; शिक्षक संघाने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जुनी पेन्शनवरून आक्रोश; शिक्षक संघाने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

googlenewsNext

बीड : जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी पुन्हा एकदा शिक्षक आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील शिक्षक संघटनांनी एकत्रित येत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.

बीड शहरातील छत्रपती संभाजी राजे क्रीडांगणावरून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. जुनी पेन्शन योजना लागू करा. शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे तत्काळ बंद करा. शिक्षणाचे व नोकऱ्यांचे खासगीकरण थांबवा, कंत्राटी शिक्षक भरती करू नका. समूह शाळेच्या नावाखाली २० पटसंख्येच्या शाळा बंद करू नका. मुख्यालयी राहण्याची अट रद्द करा व इतर मागण्यांच्या अनुषंगाने शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूभीवर बीडमध्ये सोमवारी शिक्षक संघाने मोर्चा काढला.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान पवार यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला महाराष्ट्र शिक्षक संघटना, शिक्षक परिषद, शिक्षक सेना, कास्ट्राइब शिक्षक संघटना, एकल शिक्षक संघटना, गुरुजी विचारमंच, छत्रपती संभाजी ब्रिगेड शिक्षक व कर्मचारी संघटना यांनी पाठिंबा दिल्याने जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

Web Title: Outcry over old pensions; The teachers' union took out a march to the collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.