प्रतिकूलतेवर मात करीत हमालाचा मुलगा झाला सी.ए.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:31 AM2021-02-14T04:31:26+5:302021-02-14T04:31:26+5:30
समाधानचे वडील अहमदनगर येथे माथाडी हमाल म्हणून काम करतात. यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आई मजुरी करुन संसाराला हातभार ...
समाधानचे वडील अहमदनगर येथे माथाडी हमाल म्हणून काम करतात. यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आई मजुरी करुन संसाराला हातभार लावत. मुलांनी आपल्यासारखे काबाडकष्ट न करता शिकून मोठे व्हावे असे समाधानच्या आई, वडिलांचे स्वप्न होते. ते समाधानने पुर्ण केले. समाधानचे प्राथमिक शिक्षण मामाकडे हाजीपुर येथे झाले तर पुढील शिक्षण अहमदनगर व पुणे येथे झाले. बारावीनंतर सी.ए. होण्याचा दृढनिश्चय केला. रात्रंदिवस अभ्यास करून ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी मनाशी जिद्द बाळगली. वेळप्रसंगी त्याने केटरिंगची कामे तसेच मेडिकल व इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात कामे करून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. २०१७ ला.सी ए.च्या पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश आले. परंतु २०१८ च्या परिक्षेच्या निकालात तो उत्तीर्ण झाला. त्याच्या यशाने आई-वडिलांच्या आनंदासमोर गगन ठेंगणे झाले.त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून स्वागत होत आहे.