ऑक्सिजन अलार्म वाजला अन् सगळेच घाबरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:38 AM2021-07-14T04:38:38+5:302021-07-14T04:38:38+5:30

बीड : रुग्णांना ऑक्सिजन पुरविणारे फ्लो मीटर अचानक ब्लॉक झाल्याने ऑक्सिजन अलार्म वाजला. यामुळे डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह नातेवाईक व रुग्ण ...

The oxygen alarm rang and everyone panicked | ऑक्सिजन अलार्म वाजला अन् सगळेच घाबरले

ऑक्सिजन अलार्म वाजला अन् सगळेच घाबरले

Next

बीड : रुग्णांना ऑक्सिजन पुरविणारे फ्लो मीटर अचानक ब्लॉक झाल्याने ऑक्सिजन अलार्म वाजला. यामुळे डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह नातेवाईक व रुग्ण घाबरले होते. काहींनी धावपळ करत अधिकाऱ्यांना माहिती दिली. अवघ्या १० मिनिटांत परिस्थिती पूर्ववत होऊन ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला. हा प्रकार मंगळवारी दुपारी १२ वाजता जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये घडला.

जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. यातील जवळपास रुग्ण हे ऑक्सिजनवर असतात. वॉर्ड क्रमांक सहामध्येही काही रुग्ण ऑक्सिजनवर होते. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या फ्लो मीटरमध्ये पाण्याऐवजी सलाईनचे रसायन टाकले जाते. आयसीएमआरच्या तशा सूचना असल्याचे सांगण्यात आले. परंतु, यामुळे फ्लो मीटर ब्लॉक होत आहेत. मंगळवारी दुपारीही तीन ठिकाणचे मीटर ब्लॉक झाले होते. त्यामुळे प्रेशर वाढले व ऑक्सिजन अलार्म वाजला आणि सर्वच घाबरले. परंतु जवळच असलेले शेख नावीद व अभिजित नामक कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी सेंट्रल लाइन बंद करून अलार्मही बंद केले. जे गंभीर रुग्ण होते त्यांना जम्बो सिलिंडरद्वारे तात्काळ ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. १० मिनिटांत परिस्थिती पूर्ववत झाल्याचे सांगण्यात आले. सध्या सर्व सुरळीत सुरू असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे, डॉ. सुखदेव राठाेड, डॉ. महेश माने, डॉ.बाबासाहेब टाक यांनी धाव घेत आढावा घेतला.

---

ऑक्सिजन अलार्म वाजला असला तरी त्यामुळे फार काही अडचण निर्माण झाली नव्हती. स्वतः तिथे होतो. तंत्रज्ञांनी पाहणी केली असून, फार मोठी समस्या उद्‌भवली नव्हती.

डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

130721\13_2_bed_12_13072021_14.jpeg

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करताना कर्मचारी

Web Title: The oxygen alarm rang and everyone panicked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.