कोविड सेंटरला ऑक्सिजन बँक मशीन भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:35 AM2021-07-30T04:35:20+5:302021-07-30T04:35:20+5:30
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. अन्न पाणी व हवा याशिवाय माणूस जगू शकत नाही. ऑक्सिजनशिवाय माणूस ...
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. अन्न पाणी व हवा याशिवाय माणूस जगू शकत नाही. ऑक्सिजनशिवाय माणूस काही मिनिटेही राहू शकत नाही. दुर्दैवाने ज्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या शरीरात ऑक्सिजन कमी पडत आहे. कृत्रिम ऑक्सिजन मशीनद्वारे रुग्णास ठरावीक वेळ ऑक्सिजन दिल्यानंतर रुग्णांचा प्राण वाचत आहे. वडवणी शहरातील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधा उपलब्ध नसल्याने जिल्हा रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात जावे लागत असल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशन यांच्यावतीने कोविड सेंटरला ऑक्सिजन मशीन भेट देण्यात आली. यावेळी विनायक मुळे, डाॅ. बी. एम. पुर्भे, कचरू जाधव, नागेश डिगे, सरपंच चंद्रकांत करांडे, वचिष्ट शेंडगे, युवराज शिंदे, दत्ता अलगट, हनुमंत शिंदे, भारतीय कामगार सेनेचे लातूर झोन अध्यक्ष गोविंद मस्के, कोविड सेंटर येथील डॉक्टर अधिकारी-कर्मचारी, शिवसैनिक, मित्रपरिवार, आदी उपस्थित होते. शिवसेना वडवणी तालुका यांच्यावतीने कोविड सेंटर येथे आपल्या जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा माजी तालुकाप्रमुख विनायक मुळे यांनी सन्मान करीत सत्कार केला.
290721\fb_img_1627558159917.jpg
कोविड सेंटर ला ऑक्सिजन बँक मशीन भेट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांच्या हस्ते लोकार्पण